ram charan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Charan: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण रुग्णालयात दाखल; ॲक्शन सीनदरम्यान अभिनेता गंभीर जखमी

Ram Charan: ॲक्शन सीनदरम्यान जखमी झालेल्या राम चरणच्या उजव्या मनगटावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला बरं होण्यासाठी अजून वेळ लागू शकतो.

Shruti Vilas Kadam

Ram Charan: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या उजव्या मनगटाला दुखापत झाल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहते चिंतेत होते. मात्र आता चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे राम चरणच्या मनगटावर यशस्वी सर्जरी पार पडली असून तो सध्या वेगाने बरा होत आहे.

इंडिया टिव्हीच्या माहितीनुसार, राम चरणच्या उजवा हाताला 'पेद्दी' (Peddi) चित्रपटातील एका थरारक ॲक्शन सीन दरम्यान गंभीर जखम झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे त्याला अन्य शुटिंग करताना त्रास होत होता म्हणून डॉक्टरांनी तातडीने त्याला सर्जरीचा सल्ला दिला.

यानंतर राम चरणला कोईम्बतूरमधील प्रसिद्ध गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने त्याच्यावर लॅपरोस्कोपिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शस्त्रक्रिया केली. सर्जरी यशस्वी झाल्याची माहिती त्याच्या टीमने दिली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या कठीण काळात राम चरणच्या कुटुंबाने त्याला खंबीर साथ दिली. वडील चिरंजीवी, आई सुरेखा आणि पत्नी उपासना हे संपूर्ण उपचारादरम्यान रुग्णालयात त्याच्यासोबत होते. सर्जरीनंतर वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीबाबत ठिक असल्याचे सांगितले तसेच त्या हातावर अधिक भार न देण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला दिला आहे. राम चरण संपूर्ण बरा झाल्यावरच पुन्हा शुटिंग सुरु करेल असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा शिंदेसेनेच्या आमदाराविरोधात संताप

Sunday Horoscope: नशीब चमकणार! या 3 राशींना मिळणार मोठी संधी; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : दुसरी स्त्री आवडूनही पुरुष तिच्याशी नात्याची कमिटमेंट का करत नाहीत? ‘ही’ 5 कारणं

Sunday Horoscope: मेष, सिंह, धनुसह या राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT