Director Prashanth Narayanan Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Director Prashanth Narayanan Dies: साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का, लोकप्रिय नाटककाराचे निधन; फुफ्फुसासंबंधित आजाराने होते त्रस्त

Prashanth Narayanan Passed Away: लोकप्रिय नाटककार प्रशांत नारायणन यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी तिरुवअनंतपुरम येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले.

Chetan Bodke

Director Prashanth Narayanan Passed Away

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय नाटककार प्रशांत नारायणन यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी तिरुवअनंतपुरम येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. प्रशांत नारायणन यांचे गुरुवारी (२८ डिसेंबर) निधन झाले असून त्यांच्यावर फुफ्फुसासंबंधित आजारावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या उपचाराच दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत नारायणन हे लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कामाची छाप नाट्यविश्वात निर्माण केली. प्रशांत यांनी जवळपास ६० नाटकांचे दिग्दर्शन केले असून जवळपास २५ नाटकांची पटकथाही लिहिली आहे. प्रशांत नारायणन यांनी 'छायामुखी' नाटकाचे लेखन केले होते. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल आणि मुकेश यांनी या नाटकात काम केले होते, ज्यामुळे दिग्दर्शक म्हणून प्रशांत यांची ख्याती राज्यातील प्रेक्षकांमध्ये आणखीनच वाढत गेली.

नारायणन यांनी 'मणिकर्णिका', 'ताजमहाल' आणि 'कारा' यांसारख्या अनेक प्रसिद्ध नाटकांचे दिग्दर्शनही केले होते. नारायणन यांना २००३ मध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनासाठी केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारासोबतच प्रशांत यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. केरळचे सांस्कृतिक कार्य मंत्री साजी चेरियन यांनी लोकप्रिय नाटककार प्रशांत नारायणन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, "राज्याने एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे, ज्याने गेल्या तीन दशकांमध्ये रंगभूमीच्या जगावर आपली छाप सोडली आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Cough Syrups : २ वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; मृत्यूतांडवानंतर केंद्र सरकारची अ‍ॅडव्हायजरी!

Maharashtra Politics: उद्याची ओबीसी बैठक वादळी ठरणार? दोन राजकीय विरोधक आमने सामने येणार|VIDEO

Thackeray Vs Fadnavis : उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेट! CM फडणवीसांची जहरी टीका, काय होती १००० रुपयांची पैज?

Viral News : आईच्या पश्चात पिलांना मायेची ऊब देणारा कोंबडा; पिलांचं सांभाळ करणाऱ्या कोंबड्यांचे कौतुक

SCROLL FOR NEXT