Sobhita Dhulipala And Naga Chaitanya Dating Rumors Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sobhita Dhulipala And Naga Chaitanya Dating: ‘मी कुठलेही चुकीचे काम करत नाही...’ नागा चैतन्यच्या डेटिंग अफवांवर शोभिता धुलिपालाने मौन सोडले

शोभिता धुलिपालाने सोशल मीडियावर होत असलेल्या नागा चैतन्य आणि तिच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडले आहे.

Chetan Bodke

Sobhita Dhulipala And Naga Chaitanya Dating Rumors: बार्ड ऑफ ब्लड, पोन्नियन सेल्वन -१ आणि पोन्नियन सेल्वन- २ फेम शोभिता धुलिपाला नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे नाही तर, साऊथ इंडस्ट्रितील सुपरस्टार नागा चैतन्यसोबत असलेल्या रिलेशनमुळे बरीच चर्चेत आली आहे.

दोघांमध्येही कोणत्याच प्रकारचे नाते नसून सध्या सोशल मीडियावर त्यांच्यातील नात्याची चर्चा रंगली आहे. समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य सध्या अभिनेत्री शोभिताला डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत. अलीकडेच शोभिता धुलिपालाने सोशल मीडियावर होत असलेल्या नागा चैतन्य आणि तिच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडले आहे.

पोन्नियन सेल्वन स्टार शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. काही मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचे एकमेकांना डेट करत असल्याचे फोटो सध्या बरेच व्हायरल होत आहे. नुकतंच एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतींमध्ये शोभिता आणि नागा चैतन्याने रिलेशनच्या चर्चांवर मौन बाळगले.

फिल्मबीटच्या एका रिपोर्टनुसार, शोभिताला त्यांच्यातील रिलेशनबद्दल विचारले, तेव्हा ती म्हणते, जे लोक कोणताही पुरावा नसताना आरोप करतात, माझ्या अंदाजे त्यांना मी उत्तर देणे महत्वाचे समजत नाही. जेव्हा मी कुठलेही चुकीचे काम करत नाही तेव्हा ते माझं काम नाही. तेव्हा मला कोणत्याही गोष्टीला स्पष्ट करण्याची गरज भासत नाही.

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर लगेचच चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर वेग आला. नागा- चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चांना तेव्हा निश्चिती मिळाली जेव्हा, नागा चैतन्यने सिद्धार्थ कन्ननसोबतच्या संभाषणात त्याच्या रिलेशनबद्दल माहिती सांगितली होती.

जेव्हा सिद्धार्थने नागा चैतन्यला अभिनेत्री शोभितासोबत डेटिंगबद्दल विचारले तेव्हा, नागा चैतन्यने स्पष्टपणे उत्तर न देत फक्त, त्याने लाजत 'मी फक्त हसणार आहे.' म्हणाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Merger: पुणे जिल्ह्यात विलिनीकरणाचं पहिलं पाऊल; अतुल बेनके-अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, जुन्नरमध्ये घडलं, आता राज्यात कधी?

Sunetra Pawar: दु:खातून सावरल्या, कामाला लागल्या; सुनेत्रा पवारांच्या पाठबळामुळे कार्यकर्त्यांना धीर

वर्गमित्राच्या खोलीत सापडला ३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MBA विद्यार्थिनीचा निर्वस्त्र मृतदेह; व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

शरद पवारांकडून दादांच्या नेतृत्वाला मान्यता? शशिकांत शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट, VIDEO

मंत्रालयाला लाचखोरीचा विळखा; झिरवाळांच्या दालनात ACB चा छापा, VIDEO

SCROLL FOR NEXT