Prakash Raj News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prakash Raj News: अभिनेते प्रकाश राज यांना मोठा दिलासा; कथित पॉन्झी स्कीम घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चीट

Prakash Raj tweet: अभिनेते प्रकाश राज नेहमी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागला होता. कथित १०० कोटी पॉन्झी घोटाळ्यात त्यांची ईडीकडून चौकशी झाली होती. मात्र, आता त्यांना याप्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prakash Raj Gets Clean Chit On Money Laundering Case

दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते प्रकाश राज नेहमी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागला होता. कथित १०० कोटी पॉन्झी घोटाळ्यात त्यांची ईडीकडून चौकशी झाली होती. मात्र, आता त्यांना याप्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे.

प्रकाश राज यांच्यावर प्रणव ज्वेलर्सच्या १०० कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची ईडीने कसून चौकशी केली होती. पुढे या प्रकरणाची बरीच चर्चा देखील झाली. मात्र, ईडीने प्रकाश राज यांना या प्रकरणात क्लीन चीट दिली आहे.

ईडीकडून आपल्याला क्लीन चीट मिळाल्याची माहिती प्रकाश राज यांनी आपल्या X अकाउंटवरुन दिली आहे. प्रकाश राज यांनी टीव्हीवरील बातम्यांचा आढावा घेत व्हिडिओ शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे.

प्रकाश राज यांनी X पोस्टमध्ये काय म्हटलं?

'ज्यांना तमिळ भाषा येत नाही त्यांच्यासाठी. ब्रेकिंग न्यूज - तपास पथकाची अधिकृत घोषणा. तामिळनाडूच्या प्रणव ज्वेलर्सच्या कोणत्याही पॉन्झी घोटाळ्यात अभिनेता प्रकाश राज सहभाग नाही. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे मनापासून आभार', असं प्रकाश राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रणव ज्वेलर्स मनी लॉंड्रिंग प्रकरण आहे तरी काय?

प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन कंपनीने सुवर्ण गुंतवणून योजनेच्या नावाखाली लोकांकडून १०० कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप कंपनीवर आहे.

प्रकाश राज यांची याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. ईडीने या कंपनीवर छापा टाकला होता. यात त्यांनी २३.७० लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT