Dunki And Salaar Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Dunki And Salaar Leaked: शाहरुख खानच्या 'डंकी'नंतर प्रभासचा 'सालार' ऑनलाइन लीक, कमाईवर होणार परिणाम

Salaar Movie Online Leaked: डंकी चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांमध्येच ऑनलाइन लीक झाला. त्यामुळे डंकीच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये प्रभासचा सालार देखील ऑनलाइन लीक झाला आहे.

Priya More

Salaar Movie Leaked:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतीक्षित 'डंकी' चित्रपट (Dunki Movie) गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सालार' चित्रपट (Salaar Movie) आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही सुपरस्टारच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा संपली असून त्यांनी देखील चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

डंकी चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांमध्येच ऑनलाइन लीक झाला. त्यामुळे डंकीच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये प्रभासचा सालार देखील ऑनलाइन लीक झाला आहे. दोन्ही चित्रपट एकापाठोपाठ लीक झाल्यामुळे या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शाहरुख खानचा डंकी काल प्रदर्शित झाला तर प्रभासचा सालार आज प्रदर्शित झाला. या दोन्ही सुपरस्टारचा या वर्षातला हा शेवटचा चित्रपट आहे. या दोन्ही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होत आहे. दोन्ही चित्रपटांना देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. शाहरूखच्या डंकीने पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई केली. रिलीजपूर्वी सालारच्या ५० कोटी रुपयांच्या तिकीटांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाली होती. पण आता सालारच्या निर्मात्यांसह संपूर्ण टीमला धक्का बसला आहे. डंकी लीक झाल्यानंतर आता सालार देखील लीक झाला आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार, सालार पाइरेटिड साइट्सवर लीक झाला आहे. ऑनलाइन लीक झाल्यामुळे डंकीसोबत सालारच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. खरं पाहायाला गेलं तर, डंकीची टक्कर प्रभासच्या सालारसोबत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित सालार आज प्रदर्शित झाला. पॅन इंडिया चित्रपटाच्या तिकीटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग देखील चांगले झाले होते.

सालार चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप जास्त उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत श्रृती हसन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदी या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सर्व भाषांमधील चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा चित्रपट डंकीला कमाईमध्ये मागे टाकतोय की नाही हे येत्या काही दिवसांमध्ये समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Maharashtra News Live Update: कुडाळ तालुक्यातील जांभवडे- खोचरेवाडी पूल खचला

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

Pub Fire: मध्यरात्री पबमध्ये अग्नितांडव, भीषण आगीमध्ये होरपळून २७ जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT