Vaidehi Parashurami Saam Tv
मनोरंजन बातम्या

कमी वयात लग्नानंतरच्या धम्माल गोष्टी, भन्नाट लूकनं 'याड' लावणाऱ्या वैदेहीची वाचा रोलरकोस्टर लव्हस्टोरी!

लवकरच जिओ स्टुडिओज नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जिओ स्टुडिओजने रोज नवनवीन मराठी चित्रपटांच्या घोषणेची रिघ लावलेली आहे. मराठी मनोरंजनविश्वात दिमाखात एन्ट्री करून प्रेक्षकांमध्ये आपली खास ओळख निर्माण करण्यासाठी 'जिओ स्टुडिओज' सज्ज झाले आहेत. सध्या जिओ स्टुडिओज लाडक्या प्रेक्षकांना एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट देत आहेत. लवकरच जिओ स्टुडिओज नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'जिओ स्टुडिओज' निर्मित 'एक दोन तीन चार'(EK DON TEEN CHAAR) या आगामी चित्रपटाची घोषणा हल्लीच करण्यात आली असून पुढील वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक नाविन्यपूर्ण अशी जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी(Vaidehi Parashurami) यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर याने केलं असून 'मुरांबा' या चित्रपटानंतर वरुणचा हा पुढील चित्रपट असणार आहे.

निपुण आणि वैदेही या कथानकातील कपल अगदी तरुणाव्स्थेत म्हणजे साधारण २३ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि मग या जोडप्याबरोबरच त्यांच्या जवळच्या मंडळींचीही तारेवरची कसरत सुरु होते. या सर्व प्रवासात नक्की काय-काय घडणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

'एक दोन तीन चार' बद्दल सांगताना चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणाला, 'आजच्या तरुणाईला जो चित्रपट आवडेल, चित्रपटाची कथा त्यांना त्यांच्या जवळची वाटेल; असा चित्रपट करण्याची माझी इच्छा होती. कारण लग्न हा असा विषय आहे की तो तुम्ही कुठल्याही वयात करण्याचा निर्णय घेतलात तरी त्यात गुंतागुंत असते आणि इथे तर आजकालच्या तुलनेत, अति लवकर लग्न करण्याचा निर्णय हे कपल घेतं. मला खात्री आहे की ही रोलरकोस्टर लव्हस्टोरी सर्वांनाच आपलीशी वाटेल.'

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, बहावा एंटरटेनमेंट आणि १६ बाय ६४ प्रोडक्शन अंतर्गत, रणजीत गुगळे, केयूर गोडसे, निपूण धर्माधिकारी, निरज बिनीवाले, निर्मित 'एक दोन तीन चार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT