Sonu Sood Wife Sonali Health Update: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood Wife Accident: 'ती वाचली हा चमत्कार...'; पत्नीच्या अपघातामुळे भावुक झाला सोनू सूद म्हणाला, देवाचे आभार

Sonu Sood Wife Sonali Health Update: सोनू सूदची पत्नी अजूनही रुग्णालयात दाखल आहे. तिला गंभीर दुखापत झाली आहे. पण आता ती पूर्वीपेक्षा बरा असल्याचे अभिनेत्याने म्हटले आहे.

Shruti Vilas Kadam

Sonu Sood Wife Accident: सोमवार, २४ मार्च रोजी मुंबई-नागपूर महामार्गावर बॉलीवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद, त्याची बहीण आणि पुतण्या एका मोठा अपघात झाला. या कार अपघाताची माहिती मिळताच अभिनेत्याने रुग्णालयात धाव घेतली. आता त्याने त्याच्या पत्नीच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या माहितीनुसार, सोनाली आणि त्याच्या बहिणीला अपघातात अनेक दुखापती झाल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी, त्यांना नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात अजूनही निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांना सोमवारी रात्री १०.३० वाजता दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती समोर आल्यानंतर लगेचच सोनू सूदने त्याच्या चाहत्यांना त्याच्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्याने इंडिया टुडेला सांगितले की, 'ती आता ठीक आहे. ती चमत्कारिकरित्या वाचली. यासाठी मी देवाचे आभार मानवे तेवढे कमी'. अभिनेता तिच्यासोबतच आहे आणि डॉक्टरांनी तिला कडक निरीक्षणाखाली ठेवले आहे. नागपूरमध्ये त्यांची कार एका ट्रकला धडकल्याचे वृत्त आहे.

'तिघेही रुग्ण शुद्धीवर होते'

रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, 'सोनाली सूद, तिची बहीण आणि पुतण्या यांना काल रात्री (सोमवारी) सुमारे १०:३० वाजता नागपूर येथील मॅक्स हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले. हे तिघे एका रस्ते अपघातात जखमी झाल्याचे वृत्त आहे. तिन्ही रुग्ण शुद्धीवर होते.

सुदैवाने अंतर्गत दुखापत झाली नाही.

"तिघांना अनेक जखमा झाल्या आहेत पण सुदैवाने त्यांना कोणत्याही अंतर्गत दुखापती झालेली नाही," असे निवेदनात पुढे म्हटले आहे. पुतण्याला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सोनाली सूद आणि तिची बहीण निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT