Sonu Sood Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video: अपघातग्रस्त व्यक्तीसाठी सोनू सूद धावला, स्वतः उचलून नेलं रुग्णालयात

सोनू सूदच्या या उत्कृष्ट कामाचं चाहते प्रचंड कौतुक करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - कोरोनाकाळापासून सोनू सूद (Sonu Sood) हा अनेक लोकांसाठी देवदूत बनला आहे. गेली दोन वर्षे त्याने ज्या प्रकारे लोकांना मदत केली त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अलीकडेच सोनूने पुन्हा एकदा मानवतेचे उदाहरण जागा समोर मांडले. पंजाबमधील (Punjab) मोगा जिल्ह्यातील कोटकपुरा बायपासजवळ एक रस्ता अपघात झाला. दोन वाहनांच्या धडकेत एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला स्वतः सोनू सूदने आपल्या मांडीवर घेऊन रुग्णालयात (Hospital) दाखल केले.

सोनू सूदच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर काही वेळातच सोनू सूद तेथून जात होता. अपघात पाहून तो स्वत:ला थांबवू शकला नाही आणि गाडी थांबवून जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी पोहोचला. त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सोनू सूदच्या या उत्कृष्ट कामाचं चाहते प्रचंड कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Maharashtra News Live: चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचेत - राज ठाकरे

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT