Sonu Sood New Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood New Film: वय वर्ष १९, सोनू सूदची नजर पडली अन् त्या तरूणाचं एका रात्रीत नशीबच पालटलं...

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अभिनयामुळे नाही तर, सामाजिक कार्यामुळे तो सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धीस आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sonu Sood News: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच गरजूंना मदत केली होती. अभिनयामुळे नाही तर, सामाजिक कार्यामुळे तो सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धीस आला. गरजूंच्या मदतीसाठी आजवर सोनूने अनेक काम केली आहेत. सोनू सध्या रोडीजचा नवीन सीझन होस्ट करत आहे. MTV रोडीज सीझन 19 च्या ऑडिशन्स दरम्यान, गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील शुंभम नावाच्या स्पर्धकाने, जो श्रवण-अशक्त आहे ज्याला सोनू ने त्याचा दृढनिश्चयाने आणि चिकाटीने प्रभावित केले आहे. सोनू सूदने एक उल्लेखनीय काम करून या तरुण मुलाचे स्वप्न साकार केले आहे आणि त्याला त्याच्या होम प्रॉडक्शनमधील ‘फतेह’ मध्ये एक खास भूमिका ऑफर केली आहे.

रोडीज मध्ये नेहमीच कठोर आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व म्हणून सोनू पुन्हा चर्चेत आला आहे. पण त्याने या गोष्टीने सगळ्यांची मन जिंकली. अश्या एका मुलाला कामाची संधी देऊन त्याने त्याची अनोखी बाजू दाखवली आहे. हा शो नेहमीच वेगवेगळ्या कारणा मुळे चर्चेत असतो. एकोणिसाव्या सीझनकडे वाटचाल करत असताना तो प्रेक्षकांना अश्या गोष्टीने आश्चर्यचकित करत आहे. किशोरने प्रामाणिकपणाने अभिनेता बनण्याची इच्छा सोनूला सांगून सोनूच मन जिंकल. समाजाच्या भल्यासाठी नेहमीच हातभार लावणाऱ्या लोकांना अशा संधी उपलब्ध करून देत असताना सोनू यात कोणतीही कसर सोडत नाही म्हणून नेहमीच सोनू सगळ्यांची मन जिंकतो आहे.(Entertainment Marathi News)

सोनू सूद स्टारर ‘फतेह’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. सर्वप्रथम, चित्रपटात सायबर क्राईमविषयी आहे. हा विषय सर्वाधिक चर्चित ठरला असून या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोनूने चित्रपटाची कथा लिहिली असून चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगमध्ये त्याने काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सूदने पंजाबमधील अमृतसर शहरात बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर ‘फतेह’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघरमध्ये शिंदे गटाला जबरदस्त झटका, बडे नेते भाजपच्या वाटेवर; प्रमुख पदाधिकारीही कमळ हाती घेणार

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Pune-Solapur : पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, कारने २ अलिशान गाड्यांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

Acidity in women: ॲसिडीटी, अपचन समजून ५०% लोकं करतायत 'या' गंभीर समस्येकडे दुर्लक्ष; सर्वाधिक महिला आणि मधुमेहींचा समावेश

Jawhar Heavy Rain : अतिवृष्टीने रस्ता खचला; ५० फुटाच्या लांब भेगा, रहदारी पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT