Sonia Bansal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'मध्ये पार पडलं पहिलं Eviction; २ नवीन स्पर्धकांच्या एन्ट्रीने हादरलं घर

Bigg Boss 17 Eviction: 'बिग बॉस १७'च्या पहिल्या एव्हिक्शनमध्ये ६ स्पर्धकांचा समावेश होता.

Pooja Dange

Sonia Bansal Got Evicted From Bigg Boss House:

सलमान खान होस्ट करत असलेला सर्वात वादग्रस्त टीव्ही शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस'चे १७ वे पर्व सुरू आहे. या पर्वात अनेक टीव्ही सेलेब्रिटीसह युट्युबर, गेमर सहभागी झाली आहेत. 'बिग बॉस' सुरू झाल्यापासूनच या शोमध्ये अनेक वाद-विवाद, भांडण पाहायला मिळत आहेत. दोन आठवड्यातच स्पर्धकांनी घर डोक्यावर घेतले आहे.

'बिग बॉस १७'चा दुसरा 'वीकेंड का वार' काल पार पडला. कालच्या भागात 'बिग बॉस १७'मधील पहिले एव्हिक्शन झाले. तर खेळात दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री देखील झाली. या दोन स्पर्धाकांमुळे 'बिग बॉस'च्या घरातील इतर स्पर्धकांचे धाबे दणाणले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'बिग बॉस १७'च्या पहिल्या एव्हिक्शनमध्ये ६ स्पर्धकांचा समावेश होता. सना रईस खान, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, खानजादी, सोनिया बंसल आणि अभिषेक कुमार हे स्पर्धक (Celebrity) नॉमिनेट झाले होते. सोनिया बंसलला कमी ओट मिळाल्याने 'बिग बॉस'च्या घरातून बेघर झाली. 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धकांच्या मते सोनिया बंसल चा घरातील वावर सना खानपेक्षा कमी होता.

'बिग बॉस १७'च्या घरामध्ये पहिला एव्हिक्शननातं दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. या दोन स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाची काल 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश झाला आहे. मनस्वी मगई असे या वाईल्ड कार्ड स्पर्धकांचे नाव आहे. मनस्वीने बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करण्याआधी सुंदर परफॉर्मन्स देखील केला.

'बिग बॉस'च्या घरातील दुसऱ्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची देखील घरामध्ये एन्ट्री झाली आहे. समर्थ जुरेल असे या स्पर्धकांचे नाव असून त्याने तो ईशा मालवियाचा बॉयफ्रेंड असल्याचे त्याने सांगितले आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT