Victoria Marathi Movie Teaser Instagram/@sonalee18588
मनोरंजन बातम्या

Marathi Movie Victoria: एका बंद दाराआडचे रहस्य 'व्हिक्टोरिया' उलगडणार

शेअर केलेल्या टीझरमध्ये 'व्हिक्टोरियाचे रहस्य उलगडणार' ही टॅगलाईन असून चित्रपट १६ डिसेंबरपासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) अनेक चित्रपटातून तसेच डान्स शो मधून प्रेक्षकांच्यासमोर येत आहे. ती गेल्या काही दिवसांपूर्वी अख्ख्या महाराष्ट्रात तमाशा घालणारा चित्रपट म्हणजेच 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या समोर आली होती. तिच्यासोबत पुष्कर जोगही (Pushkar Jog) चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. याआधी त्यांनी 'ती आणि ती', 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटात होते. मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

अनेक वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांच्या घोषणेचा सध्या सपाटा चालू आहे. 'माझा होशील ना' फेम विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarani) या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत असून विराजसच्या जोडीला दिग्दर्शक जीत अशोक (Jeet Ashok) ही आहे. चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी केली असून चित्रपटाचे सह निर्माते वैशल शाह आहेत.

चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनय क्षेत्रात निपूण असलेले कलाकार दिसणार आहेत. पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी दिसणार असून 'व्हिक्टोरिया' चित्रपटाच्या माध्यमातून हिरा सोहल चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे.

चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चित्रपटाचे टीझर शेअर केले आहे. शेअर केलेल्या टीझरमध्ये 'व्हिक्टोरियाचे रहस्य उलगडणार' ही टॅगलाईन असून चित्रपट १६ डिसेंबरपासून सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'व्हिक्टोरिया' सिनेमाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच स्कॉटलंडमध्ये पूर्ण झाले आहे. थरारपट असणाऱ्या चित्रपटाची माहिती विराजसने खास पोस्ट शेअर करत दिली आहे. या पोस्टमध्ये विराजस म्हणतो, "It's Wrap For व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्तांच्या धारांमधून आमची debut horror film तुमच्यापर्यंत पोहोचायला एक पाऊल पुढे आली आहे."

Edited By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT