Bakula Namdev Ghotale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीने व्यक्त केली 'ही' इच्छा; म्हणाली, अजून...

'बकुळा नामदेव घोटाळे' चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेत्री (Actress) सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या प्रोफेशल लाईफमुळे तर कधी पर्सनल लाईफमुळे. सोनाली तिच्या रोजच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तिच्या फॅन्ससोबत शेअर करत असते. त्यामुळे ती सोशल मीडियावर किती सक्रिय असते यांचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. सोनालीने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून तिने तिच्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने 'बकुळा नामदेव घोटाळे' (Bakula Namdev Ghotale) या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट (Movie) सृष्टीत पदार्पण केले. तिच्या या क्षेत्रातील प्रवासाला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. सोनालीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून काय म्हणाली?

'१५ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत “बकुळा” म्हणून प्रवेश केला… आणि तुम्ही तुमच्या मनात घर करू दिलं..

तेव्हा पासून आजतागायत दिलेल्या प्रेमाबद्द्ल मी ऋणी आहे आणि कायम राहणार.

बकुळानामदेवघोटाळे या चित्रपटाने, या भूमिकेने खूप दिलं – पुरस्कारांपासून ते स्वतःची ओळख, चित्रपटसृष्टीत पाय रोवून उभं राहण्याची ताकद पासून ते माय बाप रसिक प्रेक्षकांची साथ!

हा १५ वर्षांचा प्रवास पुढची कमीत कमी अजून १५ वर्षं असाच सुरू ठेवण्यासाठी तुमची नेहमी सारखी पाठीवर थाप असूद्या, बास

ता. क. केदार शिंदे सर तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास, माझ्यावर घेतलेली मेहनत आणि दिलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर हा प्रवास मी सुरू करू शकले, याची जाणिव आणि कृतज्ञनता कायम बाळगून ठेवीन. श्री स्वामी समर्थ”, अशी पोस्ट सोनाली कुलकर्णीने शेअर केली आहे.'

सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत आणि शुभेच्छा सुद्धा देत आहेत. यात सोनालीच्या फॅन्ससह तिचा सहकलाकारांचा देखील समावेश आहे. 'सोनालीला अजून अनेक वर्ष काम करताना बघायचे आहे', अशा कमेंट फॅन्स करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT