Somy Ali And Salman Khan Instagram @realsomyali
मनोरंजन बातम्या

Somy Ali's New Allegation On Salman Khan: सोमी अलीने सलमान खानला दिली धमकी, म्हणाली 'माझी माफ माग नाहीतर...'

सोमी अलीने पुन्हा एकदा सलमान खान विरोधात अनेक आरोप केले आहेत.

Pooja Dange

Somy Ali's New Allegation: सोमी अली ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोमी अलीने अनेकदा सलमान खानवर अनेक घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत.

सोमी अलीने पुन्हा एकदा सलमान खान विरोधात अनेक आरोप केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून सोमी अलीने सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सलमान खान विरोधात केलेल्या पोस्टमुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल केले जात आहे. आता सोमी अलीने एका केले आहे. या माध्यमातून सोमी अली सलमान खानला तिची मागण्यास सांगत आहे.

सोनीने अलीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सोमी ट्रोलर्सना उत्तर देत आहे. ती या व्हिडिओमध्ये सांगत आहे की, 'जर कोणी तुमच्याशी चांगला असेल तर तो वाईट सुद्धा असू शकतो. जर लोकांना वाटत असेल के मी सगळं पब्लिसिटीसाठी करत आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी तीन वर्षांपूर्वीही माझ्यावर झालेल्या शारीरिक अत्याचाराबाबत बोलले होते. पाकिस्तानात कुकने देखील माझाशी चुकीचे वर्तन केले होते. तो सुपरस्टार नव्हता. त्यामुळे हे सांगून मी कोणतीही पब्लिसिटी मिळविण्याचा प्रयत्न करत करत नाहीये.

१४ वर्षाची असताना माझ्यावर अतिप्रसंग उद्भवला होता. तयातून बाहेर पाडण्यासाठी मला खूप वेळ लागला. या कारणामुळे मी तीन वर्षांपूर्वी याविषयी बोलण्यास सुरूवात केली. मी नो मोर टेअर्स नावाची संस्था चालवते. जेणेकरून मी ह्युमन ट्रॅफिकिंग आणि घरगुती हिंसाचाराचे बाली ठरलेल्या लहान मुलांना आणि महिलांना वाचवू शकेन. मी पण यातील एक आहे. ज्यांनी कोणी हे अनुभवले आहे, तेच समजू शकतात की यातून बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागतो.'

सलमान खानवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावत सोमी अलीने म्हटले आहे की, 'मी २० वर्षांनी याविषयी बोलत आहे. कारण मिस्टर सलमान खान मला असे करण्यासाठी भाग आहे. सलमान सीरीज फाईट ओर फ्लाईट भारतात बॅन व्हावी यासाठी संपूर्ण ताकद लावत आहे. फाईट ओर फ्लाईटच्या माध्यमातून आम्ही अनेक लहान मुले, स्त्रिया आणि पुरुषांचे जीव वाचवू शकत होतो. पण सलमानने असे होऊ दिले नाही. यामुळेच मी हिम्मत करू शकले, नाहीतर मी त्याच्या विरोधात कधीच बोलले नसते.

माझ्याकडून आमचे नाते कधीच संपले आहे. परंतु २० वर्षानंतर त्याने मला हे बोलण्यास भाग पडले आहे. मला वाटते की, शारीरिक आणि मानसिक हिंसाचारासाठी सलमानने माझी माफी मागावी. तसेच सीरीज फाईट ओर फ्लाईट भारतात दाखविण्यात यावी.' यानंतर सोमी अली भावनिक झाली.

सलमानने सोमी विरोधात अद्याप कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यामुळे एक बाजू ऐकून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT