Sitaare Zameen Par SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par Day 8: 'सितारे जमीन पर'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू; लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 8: आमिर खान आणि जिनिलियाच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने आठ दिवसांत किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

Shruti Vilas Kadam

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 8: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट २१ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटातील आमिरच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. केवळ आमिरच नाही तर इतर कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटात जीवंतपणा आणला आहे. 'सितारे जमीन पर' मध्ये आमिरसोबत अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट दररोज भरपूर कमाई करत आहे. आता दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांच्या या चित्रपटाच्या ८ व्या दिवसाचा कलेक्शन समोर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया आतापर्यंत या चित्रपटाने किती कमाई केली आहे?

'सितारे जमीन पर'ची ८ व्या दिवशी किती कमाई झाली?

'सितारे जमीन पर'ची कथा विनोदी आणि भावनिक आहे. आतापर्यंत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. त्याचबरोबर, तो बॉक्स ऑफिसवर काजोलच्या 'मा' चित्रपटाशी स्पर्धा करत आहे. 'मा' काल म्हणजेच २७ जून रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे.

'सितारे जमीन पर' चा आठ दिवसांचे कलेक्शन

दिवस १- १०.७ कोटी

दिवस २- २०.२ कोटी

दिवस ३- २७.२५ कोटी

दिवस ४- ८.५ कोटी

दिवस ५- ८.५ कोटी

दिवस ६- ७.२५ कोटी

दिवस ७- ६.५ कोटी

दिवस ८- ६.७५ कोटी

एकूण कलेक्शन - ९४.६५ कोटी

'सितारे जमीन पर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी त्याने १०.७ कोटींची कमाई केली. आता त्याचे शुक्रवारीचे कलेक्शन आले आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, 'सितारे जमीन पर'ने ८ व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६.७५ कोटींची कमाई केली आहे. आता त्याचे एकूण कलेक्शन ९४.६५ कोटी झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: पेट्रोल डिझेलवर टॅक्स नसेल तर १ लिटरची किंमत किती? वाचा सविस्तर

Brain fluid: मेंदूमध्ये पाणी झाल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच उपचार करा अन्यथा परिस्थिती ठरेल जीवघेणी

Viral Video : तरुणांना स्टंटबाजी करणं भोवल; महागडी गाडी समुदकिनारी घेऊन गेले अन् काय घडले ते पहा

Kombdi Vade Recipe: गटारीनिमित्त घरीच बनवा टम्म फुगलेले कोंबडी वडे, नॉनव्हेजचा बेत होईल भारी

Manikrao Kokate: राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केलाय का? कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT