Miss India 2022 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Miss India 2022: कर्नाटकच्या सिनी शेट्टीने जिंकला मिस इंडियाचा किताब

राजस्थानची रुबल शेखावत ही फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिंता चौहान दुसरी रनर अप ठरली आहे.

Shivani Tichkule

मुंबई - देशाला यंदाची मिस इंडिया मिळाली आहे. कर्नाटकच्या (Karnataka) सिनी शेट्टीने मिस इंडिया 2022 चा किताब आपल्या नावे केला आहे. 3 जुलै रोजी मुंबईत (Mumbai) पार पडलेल्या मिस इंडिया 2022 च्या अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत सिनीने 'मिस इंडिया 2022'चा मुकूट आपल्या नावे केला. तर राजस्थानची रुबल शेखावत ही फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिंता चौहान दुसरी रनर अप ठरली आहे.

हे देखील पाहा -

दरवेळेप्रमाणेच यंदाही मिस इंडिया स्पर्धा अतिशय चुरशीची होती. मिस इंडिया 2022 च्या ग्रँड फिनालेला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यामध्ये नेहा धुपिया, क्रिती सेनन, मलायका अरोरा, मनीष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरिया, मिताली राज यांच्यासह अनेक कलाकार होते. क्रिती सॅननपासून ते इतर अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपली मोहिनी पसरवली. नेहा धुपियासाठी ही संधी अधिक खास बनली कारण तिला मिस इंडियाचा किताब जिंकून २० वर्षे झाली आहेत.

कोण आहे सिनी शेट्टी

मिस इंडिया 2022 चा किताब जिंकणारी सिनी शेट्टी फक्त 21 वर्षांची आहे. सध्या ती चार्टर्ड फायनान्स अॅनालिस्ट कोर्स करत आहे. सिनीला डान्सची खूप आवड आहे, तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत तिने अनेक शो केले आहे. शेट्टी ही कर्नाटकची रहिवासी असून तिचा जन्म मायानगरी मुंबईत झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT