Badshah and Isha Rikhi divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Badshah Isha Rikhi Divorce Update News : बादशाह आणि ईशा रिखी यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२६ मध्ये खासगी पद्धतीने लग्न केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत दोघे विभक्त झाले.

Alisha Khedekar

  • बादशाह आणि ईशा रिखी यांचा घटस्फोट

  • लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत घटस्फोट

  • बादशाहचं हे दुसरं लग्न होतं; यापूर्वी त्याचं लग्न जस्मिन मसीहसोबत झालं होतं

  • ईशा रिखी ‘बिग बॉस २०’मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा

सिने इंडस्ट्रीतील ब्रेकअप पॅचअपच्या घटना आपल्याला सतत ऐकायला मिळतात. अशातच आता भारतीय मनोरंजनसृष्टीत खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह आणि त्याची पत्नी ईशा रिखी यांचा घटस्फोट झाला आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी मार्च २०२६ मध्येच जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत खासगी पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाला अवघे पाच महिने होत असतानाच त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

बादशाह आणि ईशा रिखी यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली आहे. बादशाहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “मी आणि ईशा रिखीने परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा आणि आपापल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय परस्पर घेण्यात आला असून या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी कळकळीची विनंती आम्ही सर्वांना करतो.”

ईशा रिखीने यापूर्वी जून महिन्यात इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनदरम्यान बादशाहसोबतच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या प्रेमाबद्दल चाहत्यांशी गप्पा केल्या. त्यानंतर काहीच महिन्यांत दोघांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. जुलैपासूनच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. ईशाची आई पूनम रिखी यांनीही अलीकडे ‘कर्म’ या विषयावर काही पोस्ट शेअर केल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या होत्या.

दरम्यान, ईशा रिखी ‘बिग बॉस २०’ मध्ये सहभागी होऊ शकते, अशा चर्चाही सुरू आहेत. बादशाहचं हे दुसरं लग्न होतं. यापूर्वी त्याचं लग्न जस्मिन मसीहसोबत झालं होतं. दोघांचा २०२० मध्ये घटस्फोट झाला. त्यांना जेसामी ग्रेस मसीह सिंग नावाची मुलगी आहे. बादशाह आणि ईशाची भेट एका कॉमन मित्राच्या पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. मात्र, त्यांनी अनेक वर्षे आपलं नातं रिव्हिल केलं नव्हतं. २०२३ मध्ये त्यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र त्यावेळी बादशाहने त्या फेटाळून लावल्या होत्या. दरम्यान बादशाह सध्या चर्चेत असून, नुकतंच त्याचं पहिलं मराठी गाणंही रिलीज झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT