Singer Home Attack Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Home Attack: प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार; मोठा खुलासा करत म्हणाला, 'सलमान खानसोबत मैत्री...'

Singer Home Attack: पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवाल याच्या घरावर काही काळापूर्वी कॅनडातील त्याच्या घरावर गोळीबार झाला होता. आता त्याने याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

Shruti Vilas Kadam

Singer Home Attack: पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवालयने काही वर्षांपूर्वी कॅनडातील त्याच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत मोठा खुलासा केला आहे. या घटनेचा संबंध अभिनेता सलमान खानशी जोडला गेला होता. मात्र, गिप्पी ग्रेवालने अलीकडील मुलाखतीत स्पष्ट सलमान खान आणि त्याच्याबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर केले आहेत.

गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घरावर नोव्हेंबर २०२३ मध्ये गोळीबार झाला होता. त्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली. असे या टोळीने सोशल मिडियावर एक पोस्ट करत सांगितले. या पोस्टमध्ये त्यांनी गायकाची सलमान खानशी असलेल्या मैत्रीमुळे हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले गेले होते.

या घटनेबद्दल बोलताना गिप्पी ग्रेवाल म्हणाला की, “लोकांना वाटत होते की माझी आणि सलमान खानची खूप घट्ट मैत्री आहे. पण, प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. आम्ही एकत्र काम केले होते, मात्र आमच्यात पर्सनल आयुष्यात फारसा संपर्क नव्हता.” त्याने सांगितले की, एका चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती, पण त्याचा अर्थ जवळची मैत्री असा होत नाही.

गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः मुलांच्या सुरक्षिततेची चिंता त्याला सतावत होती. अशा प्रसंगी कुटुंबाला धीर देणे आणि परिस्थितीला सामोरे जाणे हेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्याने त्याने मुलाखतीत सांगितले होते.

गिप्पी ग्रेवालने पुढे सांगितले की, अशा घटना केवळ संबंधित व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास देतात. मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेला किंवा धमक्यांना समर्थन देत नाही या प्रसंगातून मी आणि माझे संपूर्ण कुटुंबातून अजूनही सावरत आहोत, असेही त्याने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात मिळणारी तेरडा रानभाजी खाल्ली आहे का? जाणून घ्या फायदे आणि सोपी रेसिपी

Sangli Crime: धक्कादायक! सांगलीत मालमत्तेच्या मोहामुळे नातजावयाकडून खूण...बनाव रचत सासूचा काढला काटा

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत सोयाबीन वडी; प्रत्येकाला आवडेल चव

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल-शहनाज गिल रिलेशनशिपमध्ये? बर्थडे पार्टीनंतरची 'ती' मूव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT