Kiran Mane Shared Meme's Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Shared Meme's: ‘भारतात मुस्लीम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात...’ अभिनेता किरण मानेचे सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Kiran Mane Post: किरण माने कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Chetan Bodke

Kiran Mane Shared Meme's

बिग बॉस मराठी ४ फेम किरण माने कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेमुळे चर्चेत असलेल्या किरण मानेंनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने एक मीम शेअर केली आहे. या शेअर केलेल्या मीमची सध्या सोशल मीडियावर प्रचंड होत आहे.

किरण माने कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक विविध विषयांवर आपले परखड मत मांडत असतात. नुकतंच किरण मानेंनी हिंदू- मुस्लिम संबंधी एक मीम शेअर केलाय. शेअर केलेल्या मीममध्ये ‘द डार्क नाईट’ या हॉलिवूड चित्रपटातला एक सीन दिसत आहे. त्या सीनमध्ये जोकर दिसत असून त्याच्यासमोर बॅटमॅन आहे. जोकर बॅटमॅनला म्हणतो, “पुन्हा सांगतो लक्षात घे... भारतात मुस्लिम आहे, म्हणून तुम्ही हिंदू आहेत. नंतर तुम्ही खालच्या किंवा वरच्या जातीचे राहणार...” किरण मानेनी शेअर केलेली ही मीम कमालीची चर्चेत आली आहे. अभिनेत्याने ही मीम शेअर करताना, कॅप्शन दिले की, ‘...हे मीम लै खोल हाय. एका फटक्यात भानावर आननारं हाय. बघा. विचार करा. लब्यू’

किरण मानेंनी शेअर केलेल्या या मीमवर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, चाहते म्हणतात, ‘बरोबर आहे किरण सर, असा एक चाहता म्हणाला. तर आणखी एक चाहता म्हणाला, ‘वैचारिक सुबत्तेचं जिवंत उदाहरण म्हणजे हे वास्तववादी मीम.’ तर आणखी एक चाहता म्हणतो, ‘खरंतर हेच भूत काढून टाकून युगा पिढीनं जर जात-जात करत बसण्यापेक्षा क्लास कसा वाढवता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे.’

दरम्यान किरण मानेंच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नाटक, मालिका आणि काही चित्रपटांमध्ये किरण मानेंनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘मुलगी झाली हो’, ‘बिग बॉस मराठी ४’ या मालिकांमधून अभिनेत्याला खरी ओळख मिळाली. तर सोबतच ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेमध्ये किरण मानेंनी चिंधीच्या वडीलांची अर्थात सिंधुताईंच्या वडीलांची भूमिका साकारत आहे. त्यासोबतच मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT