Salman Khan Lawrence Bishnoi Connection, Sidhu Moose Wala Case, Salman Khan News Saam Tv
मनोरंजन बातम्या

सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरण: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर येताच सलमानच्या सुरक्षेत वाढ, काय आहे कनेक्शन?

सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर येताच सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Salman Khan Security: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवती कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी (Sidhu Moose Wala Case) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर येताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमानवर हल्ला करण्याचा कट लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने आखला होता. (Sidhu Moose Wala Case News Updates in Marathi)

लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यांची ही टोळी पुन्हा सक्रीय होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे असे समजत आहेत. काळवीट शिकार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिलेली. त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागील सूत्रधार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा चर्चेत आहे. तुरुंगात असताना लॉरेन्स बिश्नोईने दबंग खानच्या हत्येबद्दल बोलले होते. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

हे देखील पाहा-

'सलमानला जोधपूरमध्ये मारणार'

2021 मधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लॉरेन्स आणि संपत नेहरा आहेत. लॉरेन्सचा जवळचा मित्र आणि राजस्थानचा गँगस्टर असलेल्या संपत नेहराने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती. मात्र घटनेपूर्वीच हरियाणा पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्या व्हिडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोई म्हणत आहे, जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला कळेल, सलमान खानला मारणार, याच जोधपूरमध्ये मारणार, त्या सर्वांना कळेल. अजून तर मी काहीच केले नाही, मला काहीही कारण नसताना यात ओढले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा घसरली, आठवडाभरात इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

आजीसोबत झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण; बलात्कार करून रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

Shocking News : कर्ज न फेडल्यामुळे एजंटने मर्यादा ओलांडल्या, कर्जदाराच्या पत्नीचे 'तसले' फोटो केले व्हायरल

Indurikar Maharaj Net Worth: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची संपत्ती किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT