Param sundari Instagaram
मनोरंजन बातम्या

Param Sundari : सिद्धार्थ मल्होत्रा ​​करणार जान्हवी कपूरसोबत रोमान्स; 'परम सुंदरी'चे मोशन पोस्टर आऊट !

Param Sundari motion poster out : सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जान्हवी कपूरचा नवीन चित्रपट 'परम सुंदरी' ची रिलीज डेट समोर आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Param Sundari : बॉलिवूडचा हँडसम स्टार सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री जान्हवी कपूर आगामी 'परम सुंदरी' या चित्रपटात दिसणार आहेत. हे दोघेही पहिल्यांदाच ऑनस्क्रिन पेअर झाले आहेत. मंगळवारी निर्मात्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले. यासोबतच सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जान्हवी कपूर यांच्या 'परम सुंदरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जान्हवी कपूरचा परम सुंदरी हा मॅडॉक फिल्म्सच्या प्रोडक्शन हाऊसचा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन 'दासवी' फेम तुषार जलोटा यांनी केले आहे. उत्तर भारतीय मुलगा आणि दक्षिण भारतीय मुलगी यांच्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित आहे. 'परम सुंदरी' चित्रपटाचे शूटिंग केरळमध्ये झाले आहे.

या दिवशी 'परम सुंदरी' चित्रपट होणार प्रदर्शित

मॅडॉक फिल्म्सच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘परम सुंदरी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. कॅप्शन असे लिहिले आहे की, 'नॉर्थ का स्वैग, साउथ की ग्रेस, जेव्हा दोन वेगळ्या विश्वातील लोक एकमेकांशी भिडतात तेव्हा एक ठिणगी उठते. दिनेश व्हिजन प्रस्तुत परम सुंदरी तुषार जलोटा दिग्दर्शित एक प्रेमकथा, २५ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'परम'च्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि 'सुंदरी'च्या भूमिकेत जान्हवी कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सिद्धार्थ-जान्हवीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे

मॅडॉकचे प्रमुख दिनेश विजन यांनी सांगितले की, 'जान्हवी कपूर चित्रपटात दक्षिण भारतीय मुलीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा एका दक्षिण भारतीय सुंदरी आणि दिल्लीचा ​​'परम' यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ ;परम ही भूमिका साकारत आहे. मॅडॉक फिल्म्सने सिद्धार्थच्या व्यक्तिरेखेसाठी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'उत्तरचा मुंडा सिद्धार्थ 'परम' म्हणून तुमच्या हृदयात जागा बनवण्यासाठी तयार आहे. दक्षिणेतील 'सुंदरी'च्या भूमिकेत जान्हवी कपूर तुमचे मन नक्कीच जिंकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT