Siddharth Malhotra Wedding Update SAAM TV
मनोरंजन बातम्या

Siddharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी वऱ्हाडाची लगबग सुरू

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात देखील नो फोन पॉलिसी.

Pooja Dange

Siddharth and Kiara Wedding Update: सिद्धार्थ आणि कियारा गेली तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. 'शेरशह' चित्रपटानंतर या दोघांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली होती. दोघेही एकत्र अनेकदा स्पॉट झाले होते. डेटिंग, ट्रिप्स, रोमान्सनंतर आता हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेस या हॉटेलवरती या बॉलिवूड कपलचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्याच्या या सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी जैसलमेरला पोचले आहेत. काल दोघांच्या लग्नाआधीच्या विधी पार पडल्या आहेत. आज सिद्धार्थ कियारा यांचे लग्न होणार आहे.

नुकताच सूर्यगड पॅलेसबाहेरचा एक व्हिडिओ आणि फोटो पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. सिद्धार्थ कियाराच्या लग्नाचे मंडप सजले आहे. वरात, बँड-बाजा आणि घोडी तयार आहे. या सर्वांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

हा एक शाही सोहळा असल्याने तसाच पद्धतीने सर्व कार्यक्रमाची सजावट करण्यात आली आहे. घोडीला देखील सजविण्यात आले आहे. बँड-बाजा आणि वराती मंडळी गुलाबी रंगाच्या गुलाबी रंगाचे फेट्यात दिसत आहेत. ही सर्व मंडळी नवरी कियाराला आणायला तयार आहे. तसेच काही वेळापूर्वी त्यांनी सूर्यगड पॅलेसमध्ये प्रवेश केला आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात देखील नो फोन पॉलिसी असल्याने सर्वांच्या फोनला कव्हर लावण्यात आले आहेत. काही वेळातच त्यांचा विवाहसोहळा पार पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT