Mission Majnu  Saam Tv
मनोरंजन बातम्या

रश्मिकाची ओटीटी दुनियेत एन्ट्रूी; तिच्यासोबत दिसणार बॉलिवूडचा 'हा' अभिनेता, लवकरच चित्रपट होणार प्रदर्शित

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपट 'मिशन मजनू' थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mission Majnu Movie Update: सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदाना हे 'मिशन मजनू' या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट १८ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट चित्रपगृहामध्ये प्रदर्शित न होता ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपट 'मिशन मजनू' थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच अधिकृत बातमी समोर येईल. रश्मिका मंदाना आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​पहिल्यांदाच 'मिशन मजनू' चित्रपटाच्या माध्यमातून स्क्रीन शेअर करणार आहेत. मिशन मजनूचे दिग्दर्शन शंतनू बागची यांनी केले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बॉलिवूडच्या या नवीन जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी डायरेक्ट-टू-ओटीटी प्रीमियरचा पर्याय निवडला आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर, 'मिशन मजनू' जानेवारी, 2023 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक स्पाय थ्रिलर आहे. (Netflix)

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा याचा '​​थँक गॉड' चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे चालला नाही. सिद्धार्थकडे सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांच्या 'योद्ध्या' हा चित्रपट आहे. तसेच रोहित शेट्टीचा 'इंडियन पोलिस फोर्स' हा वेब शो सुद्धा तो करणार आहे. रश्मिकाने नुकतेच 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिच्याकडे विजय स्टारर 'वारिसू' आणि सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' चित्रपट आहेत. 'वारिसू' हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT