Siddharth Chandekar Saam TV
मनोरंजन बातम्या

Wedding Photos of Siddharth Chandekar's Mother: अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आईचं लावलं दुसरं लग्न, सोशल मीडियावर लग्नाचे फोटोही केले शेअर

सिद्धार्थ चांदेकरच्या आईच्या लग्नाचे फोटो : सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

प्रविण वाकचौरे

Siddharth Chandekar's Mother Wedding Photos:

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने मोठं पाऊल उचललं आहे. सिद्धार्थने चक्क आईचं दुसरं लग्न करुन दिलं आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. आईच्या लग्नाचा एक फोटोही त्याने शेअर केला आहे.

किती ते एकटं एकटं रहायचं? आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणत सिद्धार्थ आईला मनपासून शुभेच्छा दिल्या आहेत . सिद्धार्थच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Entertainment News)

सिद्धार्थने पोस्टमध्ये काय लिहिलं?

सिद्धार्थनने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, 'तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर.' (Latest Marathi News)

सिद्धार्थने आईच्या या निर्णयात तिची साथ देत म्हटलं की, 'तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT