Siddhant Chaturvedi Shaktiman Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Celebrity Halloween Party: शक्तिमान सिद्धांत चतुर्वेदीची झाली फजिती, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने 90 च्या दशकातील भारतातील प्रसिद्ध सुपरहिरो शक्तीमानचा लूक केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Siddhant Chaturvedi: 31 ऑक्टोबर रोजी जगभरात 'हॅलोवीन डे' साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी विचित्र आणि धडकी भरेल असा गेटअप केला होता. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटींही हॅलोवीन पार्टी आणि चित्रविचित्र गेटअप केले होते.

हॅलोवीननिमित्त बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने 90 च्या दशकातील भारतातील प्रसिद्ध सुपरहिरो शक्तीमानचा लूक केला होता. या लूकमधील एक मजेदार व्हिडिओ सिद्धांत चतुर्वेदीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Bollywood)

या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्धांतने सांगितले की शक्तिमान बनणे त्याला किती महाग पडले. सिद्धांत चतुर्वेदी हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शक्तीमानच्या लूकमध्ये स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Social Media)

व्हिडिओमध्ये तो लालआणि सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये सिद्धांत चतुर्वेदी शक्तिमानसारखे वागण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असे करताना त्यांची पॅन्ट फाटली आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये तो स्वत:ला लपवताना आणि दुसरे कपडे घालताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सिद्धांत चतुर्वेदी म्हणतो, 'काय बघताय, पॅन्ट फाटले आहे पाहू नका. शक्तीमानची पॅन्ट फाटली आहे. म्हणूनच पुन्हा गंगाधर व्हावं लागेल'. हा व्हिडिओ शेअर करत त्याने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. त्याने 'सॉरी शक्तिमान', असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सिद्धांत चतुर्वेदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सिद्धांतच्या चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. (Viral Video)

सिद्धांत चतुर्वेदी लवकरच 'फोन भूत' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

Maharashtra Tourism : रंग बदलणारा महाराष्ट्रातील अनोखा तलाव, तुम्ही कधी पाहिलात का?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

SCROLL FOR NEXT