Shweta Tiwari Third Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shweta Tiwari Third Marriage: श्वेता तिवारीचं तिसरं लग्न? ८ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबतचे फोटो झाले व्हायरल

Shweta Tiwari Viral Photos: श्वेता तिवारीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये श्वेताने तिसरे लग्न केल्याचं बोललं जात आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. श्वेताने सिनेसृष्टीत तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अशातच अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. गळ्यात वरमाला असल्याचे अभिनेत्रीने तिसरे लग्न केले असल्याची एकच चर्चा रंगली आहे.

श्वेता तिवारीचा एक फोटो व्हायरल होत आहे. ८ वर्षांनी लहान विशाल आदित्य सिंहसोबत लग्न केल्याचे फोटो समोर आले आहेत. विशाल आदित्य सिंह असं अभिनेत्याचे नाव आहे. या फोटोवरून श्वेताने तिसरे लग्न केल्याचं बोललं जात आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोमध्ये श्वेता आणि आदित्यने मॅचिंग आऊटफिट घातलेला दिसत आहे. दोघांच्या गळ्यात गुलाबी फुलांच्या वरमाला आहे. सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोंमध्ये श्वेता तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी लहान असलेला अभिनेता विशाल आदित्य सिंहशी लग्न करताना दिसून येत आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी दोनदा लग्नबंधनात अडकली मात्र दोनवेळा ती घटस्फोट घेऊन विभक्त झाली आहे. अशातच श्वेताला पहिल्या पतीपासून एक मुलगी आणि दुसऱ्या पतीपासून एक मुलगा आहे. श्वेताने १८ वर्षाची असताना भोजपुरी निर्माता राजा चौधरीशी लग्न केलं होतं. मात्र अवघ्या ८ वर्षानंतर त्याचं नातं तुटलं. राजा आणि श्वेता यांनी एक मुलगी आहे जिच नाव पलक आहे. त्यांनतर श्वेता अभिनेता अभिनव कोहलीच्या प्रेमात पडली. साडेतीन चार वर्ष श्वेता आणि अभिनव एकमेकांना भेटत होते. त्यांची मैत्री घट्ट झाली. त्यानंतर अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर १३ जुलै २०१३ रोजी श्वेता आणि अभिनव हे लग्नबंधनात अडकले.पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि २०१६ मध्ये श्वेताचा घटस्फोट झाला. श्वेता आणि अभिनव यांचा एक मुलगा आहे ज्याचं नाव रेयांश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

SCROLL FOR NEXT