Shweta Tiwari Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shweta Tiwari Birthday: १८ व्या वर्षी लग्न, २७ व्या वर्षी घटस्फोट, 'एव्हरग्रीन' श्वेता तिवारीच्या आयुष्यात काय काय घडलं?

Kasauti Zindagi Ki Actress- करिअरला कलाटणी मिळत असताना श्वेता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मात्र अडचणींचा सामना करत होती.

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे. श्वेताने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमुळे श्वेता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेत श्वेताने प्रेरणा ही भूमिका साकारली होती. मात्र करिअरला कलाटणी मिळत असताना श्वेता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मात्र अडचणींचा सामना करत होती. श्वेता दोन वेळा लग्नबंधनात अडकली मात्र दोन्ही वेळेस तिला यश आलं नाही.

श्वेताने १८ वर्षाची असताना भोजपुरी निर्माता राजा चौधरीशी लग्न केलं होतं. मात्र अवघ्या ८ वर्षानंतर त्याचं नातं तुटलं. राजा आणि श्वेता यांनी एक मुलगी आहे जिच नाव पलक आहे. त्यांनतर श्वेता अभिनेता अभिनव कोहलीच्या प्रेमात पडली. साडेतीन चार वर्ष श्वेता आणि अभिनव एकमेकांना भेटत होते. त्यांची मैत्री घट्ट झाली. त्यानंतर अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर १३ जुलै २०१३ रोजी श्वेता आणि अभिनव हे लग्नबंधनात अडकले.पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि २०१६ मध्ये श्वेताचा घटस्फोट झाला. श्वेता आणि अभिनव यांचा एक मुलगा आहे ज्याचं नाव रेयांश आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी दोनदा लग्नबंधनात अडकली मात्र दोनवेळा ती घटस्फोट घेऊन विभक्त झाली आहे. अशातच श्वेताला पहिल्या पतीपासून एक मुलगी आणि दुसऱ्या पतीपासून एक मुलगा आहे. आज ती एकटी दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT