Shreyas Talpade Health Update Saam TV
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade Health Update: हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसच्या पत्नीने दिली तब्येतीबाबत मोठी अपडेट, म्हणाली..

Shreyas Talpade's Wife Deepti Shares Health Update: क्षेयसला लवकर बरं होण्यासाठी आशिर्वाद दिले. या सर्वांते मी आभार मानते. आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे.

Ruchika Jadhav

Shreyas Talpade Heart Attack:

मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे याला काल रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. शूटिंगवरून घरी परतताच तो बेशुद्ध पडला. पत्नी दीप्तीने त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आलीय. श्रेयसच्या प्रकृतीबाबत आता दीप्ती अधिक माहिती दिलीये.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांतच डिस्चार्ज

सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत दिप्तीने म्हटलंय की, माझ्या पतीची तब्येत खालावल्याचे समजताच मित्र परिवारासह चाहत्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच क्षेयसला लवकर बरं होण्यासाठी आशिर्वाद दिले. या सर्वांचे मी आभार मानते. आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज दिला जाईल, असं दीप्तीने यात म्हटलंय.

काल श्रेयसची प्रकृती बिघडल्यावर डॉक्टरांचे (Doctor) मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी तात्काळ उपचार सुरू केले. त्यांच्या कामाचेही मी आभार मानते. तसेच पत्रकारांसह चाहत्यांनी आमच्या गोपनीयतेचा आदर ठेवावा, असंही दिप्तीने या पोस्टमध्ये म्हटलंय.

काल नेमकं काय घडलं?

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शुटींग करत होता. तो सेटवर सगळ्यांशी व्यवस्थित आणि हसून खेळून बोलत होता. त्याने दिवसभर शुटींग देखील केले आणि तो पूर्णपणे ठीक होता. त्याने काही अॅक्शन सीनदेखील शूट केले. शूटिंगसंपवून तो घरी पोहोचला होता. घरी पोहचताच त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याचा हा त्रास हळूहळू जास्त वाढू लागला.त्रास सुरू झाल्याने त्याला तातडीने हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT