Aapadi Thapadi Movie
Aapadi Thapadi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

'फॅमिलीचा चित्रपट पाहा फॅमिलीसह' श्रेयस तळपदेच्या 'आपडी थापडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेने त्याच्या दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीतील हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका त्याची प्रेक्षकांच्या प्रचंड प्रसिद्धीस आली. बऱ्याच वर्षानंतर श्रेयसने या मालिकेतून पुनरागमन केले. बॉलीवूडच्या त्याच्या प्रवासानंतर श्रेयस मराठी मालिका आणि चित्रपटांपासून दूर होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याने पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीत आपले वर्चस्व निर्माण केले. लवकरच श्रेयस 'आपडी थापडी' हा नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

श्रेयस तळपदेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून माहिती दिली आहे. त्याने, आता पिक्चरचा ट्रेलर पाहा...कसा वाटला ते सांगा. चित्रपट ५ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. असे म्हटंले आहे. चित्रपट हा एक कौटुंबिक आहे. जो दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची टॅगलाईन फॅमिलीचा चित्रपट पाहा फॅमिलीसह अशी आहे. ट्रेलरवरून चित्रपट मनोरंजक आहे असे वाटते. कौटुंबिक कथा असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात संदीप पाठक यांच्या सुंदर आवाजाने होत आहे. कंजूस स्वभाव असलेला सखाराम पाटील म्हणजे श्रेयस तळपदे फ्री मिळणाऱ्या गोष्टी मिळविण्यासाठी धडपडत असतो. सखाराम पाटीलच्या पत्नीची भूमिका मुक्त बर्वे साकारत आहे. या दाम्पत्यांना एक छोटी मुलगी सुद्धा आहे. या त्रिकोणी कुटुंबाभोवती ह्या चित्रपटाची कथा फिरते आहे. चित्रपटातील श्रेयस आणि मुक्त यांची मुलगी पिंकू कोण आहे? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील म्हणजेच श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असे हे पाटील कुटुंब या चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. सखाराम पाटीलच्या स्वभावाचे उदाहरण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर या चित्रपटाला एक भावनिक छटा सुद्धा असल्याचेही ट्रेलरमधून कळते. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'आपडी-थापडी' हा एक मनोरंजक चित्रपटाचा अनुभव सहकुटुंब चित्रपटगृहात घ्या.

आपडी थापडी या चित्रपटाची निर्मिती प्रस्तुती के सायलेंटच्या केसी पांडे यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद करीर यांनी केले आहे. सुमन साहू यांनी चित्रपटाची सिनेमेटोग्राफी केली आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे कलाकार चित्रपटात आहेत.

Edited By- Manasvi Choudhary

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambulance Scam: राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा? कोर्टानं शिंदे सरकारकडे मागितला खुलासा; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

Today's Marathi News Live : योद्धा शरण जात नाही, म्हणून त्याला बदनाम केलं जातं; अमोल कोल्हे

Chicken Shawarma : शोरमा खाल्ल्याने तरुणाचा गेला बळी, फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक? तज्ज्ञ म्हणाले...

Avneet Kaur : अवनीत कौरच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून नजरच हटणार नाही

SRH vs LSG,IPL 2024: हैदराबाद- लखनऊमध्ये रंगणार काँटे की टक्कर! या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT