मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor Post: जादू परत येतोय! श्रद्धा कपूरच्या पोस्ट कमेंट करत हृतिक रोशन दिली 'क्रिश ४'ची हिंट

Shraddha Kapoor Photo: श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Pooja Dange

Hrithik Roshan Commented On Shraddha Kapoor Photos:

श्रद्धा कपूर बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धा तिच्या स्वभावाने फॅन्सची मने जिंकून घेत असते. तिचे सौंदर्य, अभिनय आणि डान्सचे अनेक चाहते आहेत.

श्रद्धा कपूर सध्या खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या श्रद्धाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करण्याचा मोह हृतिक रोशनला देखील आवारात आलेला नाही.

श्रद्धा कपूर फोटो

श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणं पडत आहेत. तर या फोटोंना कॅप्शन देत श्रद्धा कपूरने लिहिलं आहे. 'जादूसारखी मला देखील धूपची गरज आहे.'

श्रद्धा कपूरने हे फोटो पोस्ट करताच त्यावर अनेक कमेंट आल्या आहेत. अभिनेता हृतिक रोशन देखील तिच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. हृतिकने लिहिले आहे की, 'तो येतोय. आपण त्याला सांगू' यासह त्याने एक स्माईली देखील शेअर केला आहे.

जादू येत असल्याचे सांगत हृतिक रोशन मोठी हिंट दिली आहे. 'क्रिश'चा नेक्स्ट पार्ट आपल्या भेटीला येणार अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे. यावर्षी 'कोई मिल गया' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २० वर्षे झाली आहेत. दरम्यान हृतिक रोशन आणि राकेश रोशन यांना 'क्रिश'चा पुढचा भाग कधी येणार याविषयी विचारण्यात आले होते.

श्रद्धा कपूरने केली पोस्ट आणि त्यावर हृतिक रोशनची कमेंट यामुळे 'क्रिश' आणि जादूचे फॅन्स खूप उत्सुक झाले आहेत. 'क्रिश' हा 'कोई मिल गया'चा सिक्वेल आहे. या सीरीज आताही खूप क्रेझ आहे. त्यामुळे या पोस्टने प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या चित्रपटाची अपडेट मिळाली आहे. 'क्रिश ४'ची प्रेक्षकांची आतुरता वाढली आहे.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती यावर्षी रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कर'मध्ये दिसली होती. यासोबतच ती लवकरच 'स्त्री 2'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT