Shoaib-Sania Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shoaib-Sania: सानियाशी लग्न का करू वाटलं? शाहरूख खानचा प्रश्न; शोएबचं उत्तर ऐकून नेटकरी चक्रावले

Shoaib-Sania Divorce: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबतच्या लग्न केलं. त्यानंतर सानिया मिर्झा आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झालीय. यादरम्यान त्यांचा मागील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने सांगितलं सानियाशी लग्न करताना विचार करण्यास वेळ मिळाला नव्हता असं सांगितलं आहे.

Bharat Jadhav

Shoaib Maliks Answer On why He married Sania Mirza :

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर करून अनेकांना आश्चर्यचकित केलं. शोएबच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या अफवा खऱ्या असल्याचं समोर आलं. काही दिवसांपासून टेनिस स्टार सानिया मिर्झा शोएबच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. सानियापासून घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान शाहरुख खानसोबतच्या माजी जोडप्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झालाय. (Latest News)

यात शोएब म्हणालाय की, सानियाशी लग्न करताना त्याने विचार केला नव्हता. त्याच्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फॅन पेजच्या इंस्टाग्राम पोस्टवर एका टीव्ही शोचा हा व्हिडिओ आहे. यात शाहरूख खान, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक दिसत आहेत. यात शाहरूख खान त्यांना त्याच्या लग्नविषयी प्रश्न करताना दिसत आहे. अभिनेता शाहरूख खानने दोघांना त्यांच्या नात्याविषयी विचारलं.

शाहरूख खानचा सानियाला प्रश्न

“उसमें क्या ऐसा देखा की अपनी जल्दी से शादी कर ली? खूबसूरत है, क्रिकेट भी थेक खेलता है, सबकुछ बढिया है, का काही वैयक्तिक गोष्ट आहे?” या प्रश्नाला सानिया मिर्झा उत्तर देते, “मैं तो बहुत कुछ देखा है इनमे...बहुत शर्मिले है. ये आपको सिखाना पडेगा इंको थोडा बात करना.” त्यावर एसआरके म्हणजे शाहरूख खानने विनोद केला आणि म्हणाला, "वो तो मैं अॅडजस्ट कर लुंगा, डोन्ट वरी,

त्यानंतर शाहरूख खान शोएबला सानियाशी लग्न करण्याचं कारण विचारतो. "और तुम्हे सानिया के बारे में क्या अच्छा लगा जो तुम्हे मोहब्बत हो गई, प्यार हो गया?" यावर शोएब म्हणाला की, “सोचने का समय नहीं मिला, पहले शादी हो गई. शोएबने तेव्हा दिलेलं उत्तर नेटकऱ्यांना आता धक्का देत आहे. नेटकरी आधी दिलेल्या उत्तराचा संबंध आता त्याच्या तिसऱ्या लग्नाशी संबंध जोडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT