Shiva Kinjawadekar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shalva Kinjawadekar : शुभमंगल सावधान! 'शिवा' फेम अभिनेता चढला बोहल्यावर, पाहा लग्नाचे PHOTO

Shalva Kinjawadekar Wedding : 'शिवा' फेम मराठी अभिनेता शाल्व किंजवडेकर नकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहे. अनेक कलाकारांच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकताच मराठी अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shiva Kinjawadekar ) याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

siddharth chandekar

अभिनेता शाल्व किंजवडेकरचा आज गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरशी (Shreya Daflapurkar) लग्नसोहळा पार पडला आहे. यांच्या लग्नाचा पहिला फोटो अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाल्व आणि श्रेया दोघेही फोटोंमध्ये खूपच छान दिसत आहेत. शाल्व आणि श्रेया यांनी लग्नासाठी पारंपारिक लूक केला आहे.

शाल्वने लग्नात लाल रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर श्रेयाने लाल रंगाची काठापदराची साडी नेसली आहे. सध्या चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून श्रेया आणि शाल्ववर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी लग्नाचा प्रत्येक समारंभ खूप थाटात पार पाडला. दोघे एकत्र खूप संदर आणि आनंदी दिसत आहेत.

अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. येऊ कशी तशी मी नांदायला आणि शिवा या शाल्वच्या गाजलेल्या मालिका आहेत. शाल्व आणि श्रेया अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता अखेर १४ डिसेंबरला २०२४ ला त्यांनी लग्नगाठ बांधली.

शाल्व हा सध्या 'शिवा' या मालिकेत आशुच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याच्या पात्राला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत आहे. 'शिवा' या मालिकेत शाल्व किंजवडेकर अभिनेत्री पूर्वा कौशिकसोबत स्क्रीन शेअर करत आहे. शाल्वची बायको श्रेया डफळापूरकर ही फॅशन डिझाइनर आहे. 2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यात शाल्व आणि श्रेयाने आपल्या साखरपुडा केला होता. शाल्वचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT