Shiv Thakare And Nimrut Kaur Instagram/ @nimritahluwalia
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare: 'प्रेम की फक्त मैत्री?' अखेर शिवने निमरित कौरसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

सध्या शिवकडे एक आगामी शो, नव्या चित्रपटाची ऑफर असून त्याने त्याच्या रिलेशनशिपबद्दल ही भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

Shiv Thakare And Nimrut Kaur: 'बिग बॉस १६' च्या ग्रँड फिनालेनंतर शिव ठाकरेचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जरीही त्याला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागत असले तरीही त्याची सध्या बरीच चर्चा होत आहे. शिव ठाकरे 'बिग बॉस १६' च्या घरातून बाहेर पडताच त्याचे नशिबच पालटले आहे. सध्या शिवकडे एक आगामी शो, नव्या चित्रपटाची ऑफर असून त्याने त्याच्या रिलेशनशिपबद्दल ही भाष्य केलं आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत,शिव ठाकरेने 'बिग बॉस १६' मध्ये असल्यापासून निमरित कौर अहलुवालियासोबतच्या नात्याबद्दल सांगितले. 'बिग बॉस १६' चा विजेता रॅपर MC स्टॅन असून उपविजेता शिव ठाकरे आहे. दुसरा रनर अप प्रियंका चहर चौधरी झाली. या शोमध्ये निमरित आणि स्टेनची जोडी चांगलीच पसंदीस आली होती. अनेक चाहत्यांनी शिव आणि निमरित कौर अहलुवालियाच्या जोडीला 'शिव्रुत' असे नाव दिले आहे. ही बिग बॉसमधील जोडी रियल लाईफमध्येही बरीच पसंदीस पडली आहे.

पण शिव ठाकरे आणि निमरित यांच्यात खरंच प्रेमसंबंध आहे का?, भविष्यात ही जोडी प्रेक्षकांच्या पसंदीस उतरेल का? असा प्रश्न सध्या सर्वत्रच विचारला जात आहे. यासंदर्भात शिव ठाकरेने सिद्धार्थ कन्ननसोबत बोलताना सांगितले की, 'रोमँटिक बोलून होत नाही. त्या व्यक्तीविषयी हृदयात भावना तयार व्हायला हवी, आमच्यात नेहमीच खूप चांगले संबंध आहेत. माझ्यात आणि निमृतमध्ये मैत्री पुर्ण संबंध आहेत.

आम्ही नेहमीच एकमेकांसोबत अनेक बाबी शेअर करत असतो. निमृतने माझी बिग बॉसच्या घरात असताना अनेकदा काळजी घेतली आहे, त्यामुळे आम्ही आजही खूप चांगले मित्र आहोत. आमच्यात आतापर्यंत कधीच प्रेमाचे नाते नव्हते. शिव ठाकरेने नुकतेच इन्स्टाग्रामवर लाईव्ह दरम्यान चाहत्यांना सांगितले की, त्यांला एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर देण्यात आली आहे, त्यासाठी मीटिंगही पूर्ण झाली आहे.

शिवने सांगितले होते की हा खूप मोठा चित्रपट आहे, ज्यात बॉलिवूडची अनेक मोठे कलाकार आहेत. चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल, असे शिवाचे स्वप्न होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT