Shiv Thakare Rected 2 Movies Instagram @shivthakare9
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare Rejected Movie: काय सांगता..! शिव ठाकरेने नाकारले २ बडे चित्रपट; समोर आलं मोठं कारण

Shiv Thakare Career: शिवने रिअॅलिटी शोसाठी दोन मोठ्या मराठी चित्रपटांची ऑफर नाकारली आहे.

Pooja Dange

Shiv Thakare In Khatron Ke Khiladi: मराठी 'बिग बॉस २'चा विजेता आणि हिंदी 'बिग बॉस १६'चे पर्व गाजवलेला स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस नंतर देखील शिवाची सतत चर्चा होत असते. रोडीज पासून त्याने रिअॅलिटी शो करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मराठी बिग बॉस मार्फत महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली. मग हिंदी बिग बॉसमध्ये त्याने संपूर्ण देशाला त्याची दाखल घ्यायला भाग पडले.

बिग बॉस मराठीचे २ पर्व आणि हिंदीचे १६ वे पर्व त्याच्या नावाने ओळखला जाते. बिग बॉसमुळे शिव ठाकरेला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. शो संपल्यानंतरही लोकांना शिव ठाकरेला पाहायला आणि त्याच्याविषयी ऐकायला आवडते.

तीन रिअॅलिटी शो केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिव ठाकरे स्टंटवर आधारित शो खतरों के खिलाडीच्या नव्या सीझनमध्ये दिसणार आहे. शिवने आधीच सांगितले होते की तो रोहित शेट्टीच्या शोमध्ये सहभागी आहे.

मात्र हा शो करण्यासाठी शिवाला खूप काही गमवावं लागलं आहे. शिवने रिअॅलिटी शोसाठी दोन मोठ्या मराठी चित्रपटांची ऑफर नाकारली आहे. आता त्याने असे का केले हा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. कारण शिवने बिग बॉसच्या घरात सांगितले होते की, त्याला मोठा अभिनेता व्हायचे आहे.

या प्रश्नाला उत्तर देताना शिव ठाकरे म्हणाले की, त्याला या चित्रपटाची ऑफर आली होती, मात्र त्याने ती नाकारली. एका उत्तम दिग्दर्शकाचा चित्रपट होता. दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एप्रिलपासून सुरू होणार होते आणि ते मे महिन्याच्या अखेरीस संपणार होते. पण त्याच्या या तारखा क्लॅश होत होत्या. या तारखांसाठी शिवने खतरों के खिलाडीसाठी आधीच कमिटमेंट दिली होती. (Latest Entertainment News)

शिव ठाकरेच्या म्हणण्यानुसार, त्याला हा शो करण्याची खूप इच्छा होती. त्याला कॅमेऱ्यासमोर स्वत:ला जसा आहे तसा दाखवायला आवडते. त्यामुळे त्याला प्रेक्षकांशी नेहमी कनेक्टड असल्यासारखे वाटते.

सध्या तो त्याच्या भाषेवर भर देत आहे. त्याचसह तो इतर अनेक अनेक गोष्टी करत आहे. अमरावतीतून इथपर्यंत पोहोचणे म्हणजे तो योग्य दिशेने जात आहे, असे शिवाचे मत आहे. शिवाला चित्रपट करायचे नाहीत असे नाही तरी. येत्या काही वर्षांत तो नक्कीच चित्रपट करेल, असा विश्वास त्याला वाटतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT