Shiv Thakare In Jhalak Dikhhla Jaa 11  Instagram
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare New Reality Show: भावा किती शो करशील? 'खतरों के खिलाडी' संपताच शिव ठाकरेंची नव्या शोमध्ये एन्ट्री

Shiv Thakare New Show: शिव ठाकरे नवीन शोमध्ये सहभागी होणार असल्याने त्याचे फॅन्स खूप आनंदी आहेत.

Pooja Dange

Jhalak Dikhhla Jaa 11 contestants announced:

'बिग बॉस मराठी २'मधून शिव ठाकरेने महाराष्ट्रात त्याची ओळख निर्माण केली. शिव ठाकरे 'बिग बॉस' विजेता ठरला. त्यानंतर शिव एका पाठोपाठ एक रिऍलिटी शो करत आहे.

रोहित शेट्टी होस्ट करत असलेला शो 'खतरों के खिलाडी १३'चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला. या रिऍलिटी शोमध्ये शिव ठाकरे सहभागी झाला होता. हा शो संपल्यानंतर शिव ठाकरे आणखी एका शोसाठी सज्ज झाला आहे.

डान्स रिऍलिटी शो 'झलक दिखला जा ११' सुरू होणार आहे. या शोचे पोस्टर रिव्हील करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांची चर्चा होत आहे. या नावांमध्ये तगडी फॅन फॉलोईंग असणाऱ्या सेलेब्रिटींचा समावेश आहे.

'झलक दिखला जा'च्या निर्मात्यांनी या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी जाहीर केली आहे. या स्पर्धकांमध्ये कुस्तीपटू संगीत फोगाट, टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिम, टीव्ही अभिनेत्री करुणा पांडे, अड्रिजा सिन्हा, उर्वीशा ढोलकीया, आमिर अली, राजीव ठाकूर, अंजली आनंद आणि शिव ठाकरे या पर्वात दिसणार आहे.

शिव ठाकरे 'झलक दिखला जा'मध्ये सहभागी होणार असल्याने त्याचे फॅन्स खूप खुश आहेत. शिवाचे फॅन्स कमेंट करत त्यांचा नाद व्यक्त करत आहेत. 'शिवला या शोमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे', 'शिव ठाकरे बेस्ट आहे', शिव ठाकरे शो गाजवणार आहे', 'शिव ठाकरेसाठी मी हा शो पाहणार आहे', 'डान्सने शिव आग लावणार आहे', 'रिऍलिटी शोचा किंग' अशा अनेक कमेंट शिव ठाकरेंच्या पोस्टवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT