Shilpa Shinde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhalak Dikhala Ja: अंगूरी भाभीने केला 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा लूक, लूक जबरदस्त चर्चेत

अंगूरी भाभी येत्या शनिवारी श्रीदेवीच्या खास अवतारात प्रेक्षकांच्या समोर झळकणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: हिंदी टेलिव्हिजनवरील अनुभवी अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शिंदे (Shilpa Shinde). शिल्पाने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. सोबतच अनेक रिअॅलिटी शो मधून होणाऱ्या तिच्या डान्सने आपल्या चाहत्यांचे मने जिंकले आहेत. आता पुन्हा एकदा शिल्पा शिंदे आपल्या कलाकृतीने प्रेक्षकांचे मने जिंकायला तयार झाली आहे. तिने आपल्या नृत्याने चार चॉंद लावले आहे. शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Social Media) तिचे काही फोटोज् शेअर केले आहेत.

चाहत्यांकडून सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोज् आणि व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. कलर्सवर प्रदर्शित होणारा रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhala Ja) १०व्या पर्वात बॉलिवूड थिमवर सर्वच स्पर्धक थिरकणार आहेत. अंगूरी भाभी येत्या शनिवारी श्रीदेवीच्या खास अवतारात प्रेक्षकांच्या समोर झळकणार आहे. यावेळी अंगूरी भाभी हिम्मतवाला चित्रपटातील श्रीदेवीचा (Shri Devi) लूक घेत तिच्या सिग्नेचर पोजमध्येही दिसत आहे.

'झलक दिखला जा' च्या १०व्या पर्वातील शिल्पाच्या लूकला चाहत्यांनी चांगलीच पसंदी दिली आहे. सोशल मीडियावर चाहते शिल्पाची खूप स्तुती करीत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत शिल्पाने कॅप्शन लिहिले आहे की, ' 'झलक दिखला जा' च्या १०व्या पर्वात या आठवड्यात बॉलिवूड थीम असणार आहे. सोबतच यावेळी मी अभिनेत्री श्रीदेवी यांनी सादर केलेल्या एका गाण्यावर नृत्य करणार आहे.' तसेच शिल्पा हिंदी बिग बॉसच्या ११व्या सीझनची विजेती ही होती.

शिल्पा शिंदे नेहमीच सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. सोशल मिडीयावर नेहमीच तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील बाबी शेअर करत असते. सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT