Shilpa Shetty Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty : पायाला दुखापत होऊनही शिल्पा शेट्टीनं केलं लाडक्या बाप्पाचं जल्लोषात स्वागत

शिल्पा शेट्टी जखमी असूनही गणेशाच्या स्वागतासाठी उत्साहाने हजर होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : यंदा कोरोना विषयक निर्बंध हटविण्यात आले असून सर्व भाविक गणपती बाप्पाच्या(Ganpati Bappa) मूर्तीची स्थापना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदा गणेशोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे, आपले बॉलिवूड सेलिब्रिटी देखील गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी आणि आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा करण्यासाठी उत्साही आहेत. अलीकडेच, अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Sheety) आणि तिचा पती राज कुंद्रा(Raj Kundra) यांनी गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणली आहे. लालबागमध्ये गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी गेले असता राज कुंद्राला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. तसेच शिल्पा जखमी असूनही गणेशाच्या स्वागतासाठी उत्साहाने हजर होती. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये राज कुंद्राने पांढऱ्या रंगाची हुडी घातली आहे. तसेच हातात गणेशमूर्ती घरी घेऊन जाताना दिसत आहे. राजने मूर्ती घरी आणली, तेव्हा शिल्पा शेट्टी क्रॅच घेऊन तिच्या घरी आलेल्या गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी येताना दिसली. या व्हिडीओमध्ये बाप्पाच्या आगमनाचा आनंद शिल्पाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. शिल्पाने पांढऱ्या रंगाचा लांब टी-शर्ट आणि काळी पँट परिधान केली आहे. या साध्या लूकमध्येही शिल्पा खूप सुंदर दिसत आहे.

शिल्पा शेट्टीला अलीकडेच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या कॉप ड्रामाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. तिला दुखापत झाली असूनही तिने अलीकडेच व्हीलचेअरवर बसून एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

शिल्पा शेट्टी लवकरच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या पोलिसांवर आधारित वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरीजमध्ये शिल्पा ही सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉयसोबत दिसणार आहे. अलीकडे, तिने सेटवरील एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ आणि रोहित शेट्टी सेटवर मस्ती करताना दिसत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT