Shilpa Shetty Pizza Restaurant Opening Instagram @theshilpashetty
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा नवा उद्योग; 'बिझ्झा'मध्ये विकतेय 'पिझ्झा', व्हिडिओ झाला व्हायरल

शिल्पा शेट्टीने आता मुंबईत पिझ्झा रेस्टॉरंट सुरू केले आहे. ज्याची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Shilpa Shetty Viral Video: बॉलिवूड स्टार्स अभिनयाव्यतिरिक्त अनेक उद्योग-व्यवसाय करत असतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाचा देखील या यादीत समावेश आहे. अभिनयाव्यतिरिक्त शिल्पा शेट्टीला आपण रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून पाहिले आहे. याशिवाय ती यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया अकाउंटवरून योगा आणि कुकिंग टिप्स देताना दिसत असते.

शिल्पा शेट्टीने आता मुंबईत पिझ्झा रेस्टॉरंट सुरू केले आहे. ज्याची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या शिल्पा शेट्टीच्या एका व्हिडिओची इंटरनेटवर चर्चा आहे. ज्यामध्ये ती तिच्या रेस्टॉरंटच्या बाहेर पापाराझींना पिझ्झा खायला घालताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टीने खूप आधीच्याच तिच्या रेस्टॉरंट क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. 'बॅस्टीन बाय शिल्पा शेट्टी' नावाचे मुंबईतील वरळी येथील तिचे रेस्टॉरंट आहे. शिल्पा शेट्टीने नुकतेच मुंबईत पिझ्झा रेस्टॉरंट उघडले आहे. शिल्पा शेट्टीच्या या पिझ्झा रेस्टॉरंटचे नाव 'बिझ्झा' आहे.

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा तिच्या नवीन रेस्टॉरंट ओपनिंगनंतर बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना पिझ्झा देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पापाराझींशी बोलताना शिल्पा म्हणते, 'अशावेळी तोंड गोड करायचे असते, पण आज मी तोंड पिझ्झा करतेय'. शिल्पाची ही स्टाईल सोशल मीडियावर चाहत्यांना आवडत आहे. (Social Media)

शिल्पा तिच्या नवीन रेस्टॉरंटच्या ओपनिंगमध्ये मुलगा विआन आणि मुलगी समिशासोबत पोज देताना दिसली. शिल्पा शेट्टी तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. शिल्पा तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. 'बिझ्झा'च्या ओपनिंगच्या वेळही शिल्पा शेट्टीने तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांची मने जिंकली. रेस्टॉरंट ओपनिंग दरम्यान शिल्पा अगदी सिंपल लूकमध्ये दिसली. शिल्पाने लाल रंगाचा ट्युनिक ड्रेस घातला होता. लूक पूर्ण करण्यासाठी शिल्पाने एका हातामध्ये कडे घातले होते आणि केस मोकळे ठेवले होते. (Shilpa Shetty)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT