Shilpa Shetty Ganpati Visarjan Saam TV
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Ganpati Visarjan: शिल्पा शेट्टीचा मराठमोळा थाट! ढोल-ताशाच्या तालावर बेभान नाचत दिला बाप्पाला निरोप

Shilpa Shetty Ganpati Celebration: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा गणपती विसर्जन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला.

Pooja Dange

Shilpa Shetty Upcoming Movie:

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा गणपती विसर्जन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. शिल्पा शेट्टीने तिच्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी नाशिक ढोल पथकाला बोलावले होते. नाशिक ढोलच्या गजरात हा विसर्जन सोहळा अगदी थाटात पार पडलं. या ढोल ताशा पथकात पारंपारिक तालवाद्यांमध्ये पारंगत असलेल्या २१ प्रतिभावान महिलांचा सहभाग होता.

शिल्पा शेट्टी नेहमीच सगळे सण - उत्सव साजरे करताना दिसते. प्रत्येक उत्सव खास करण्यासाठी ती स्वतः हुन पुढाकार घेते. घरच्या बाप्पाला देखील तिने भक्तिभावाने निरोप दिला. शिल्पा शेट्टी नाशिक ढोलच्या तालावर बिनधास्त नाचत होती. तिच्या सोबत तिची बहीण सुष्मिता आणि मुलगा देखील होता.

शिल्पा शेट्टीने यावेळी मराठमोळा लूक केला होता. शिल्पा शेट्टीने सुंदर गुलाबी नऊवारी साडी नेसली होती आणि त्यावर साजेसा पिवळा ब्लाउज घातला होता. नाकात नाथ, कंबरेला कंबरपट्टा, केस फुलं देखील तिने माळली होती. अनवाणी जात तिने बाप्पाचं विसर्जन केलं आहे. तसेच तिच्या मुलाने देखील एक त्याच्या हाताने एक छोटी बाप्पाची मूर्ती तौर केली होती. ज्याचे विसराजां त्याने त्याच्या मावशीच्या मदतीने केले.

सोनल जोशी दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि शिखा शर्मा निर्मित 'सुखी'साठी शिल्पा शेट्टी सज्ज झाली आहे. या चित्रपटात अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार, कुशा कपिला आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे, ज्यांनी उत्कृष्ट कामगिरीचे आश्वासन दिले आहे.

22 सप्टेंबर रोजी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शिल्पा शेट्टी कुंद्रा रोहित शेट्टीच्या "भारतीय पोलिस फोर्स" मध्ये पहिल्या महिला पोलिसाच्या भूमिकेत देखील दिसणार आहे. तसेच तिच्याकडे "KD" नावाचा कन्नड चित्रपट सुद्धा आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT