Sharad Ponkshe share post for His Daughter  saam TV
मनोरंजन बातम्या

Sharad Ponkshe Share Post : बापाला आणखी काय हवं ? पायलट लेकीसाठी शरद पोंक्षेंची खास पोस्ट

Pooja Dange

Sharad Ponkshe Post Share Post For Pilot Daughter :

अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत असतात. शरद पोंक्षे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणासाठी ओळखले जातात. अनेकदा शरद पोंक्षे यांना यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. शरद पोंक्षे यांनी नुकतीच केली पोस्ट केली आहे.

आपल्यावर कोण काय बोलते यापेक्षा आपल्याला जे महत्वाचे वाटते ते बिनधास्तपणे सांगायला, बोलायला हवे अशी भूमिका पोंक्षे यांनी नेहमीच घेतली आहे. शरद पोंक्षे यांनी त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून पोंक्षे यांनी त्यांच्या लेकीचं कौतुक केले आहे.

शरद पोंक्षे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'कु. सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता ४ थी पासून तिने पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.

कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हवं नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा!'

शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवर स्पृहा जोशी, अश्विनी कासार, मानसी साळवी या सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत सिद्धीचे अभिनंदन केले आहे. तर शरद पोंक्षे यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. ही पोस्ट करताना शरद पोंक्षे यांनी मुलीचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. (Latest Entertainment News)

शरद पोंक्षे यांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी नुकताच ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला निरोप दिला आहे. कामाच्या काही कमिटमेंटमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटामध्ये शरद पोंक्षे डॉ हेडगेवार ही भुमिका साकारणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT