Siddhanth kapoor Arrest Ani/ Tweeter
मनोरंजन बातम्या

Siddhanth kapoor : श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला अटक; ड्रग्ज घेतल्याचा आरोप

सिद्धांत कपूरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बॉलिवडू विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ आणि शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर (Siddhant Kapoor) याला ड्रग्ज (Drug Case) प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंगळुरूच्या रेव्ह पार्टीतून सिद्धांत कपूरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकाराने बॉलिवूड विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. (Siddhant Kapoor Drug Case Latest marathi News)

रविवारी रात्री बेंगळुरूमध्ये झालेल्या एका पार्टीत सिद्धांतने ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. एम. जी. रोडवरील एका हॉटेलमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी तातडीने या हॉटेवर छापा टाकला. यावेळी पार्टीत हजर असलेल्या लोकांनी ड्रग्ज घेतलं की नाही हे तपासण्यासाठी चाचणी करण्यात आली.

या चाचणीत सिद्धांत कपूर याच्यासह इतर सहा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांनी आधीच ड्रग्जचं सेवन करून हॉटेलमध्ये प्रवेश केला की हॉटेलमध्ये आल्यानंतर ड्रग्ज घेतलं, हे अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या सिद्धात कपूर पोलिसांचा ताब्यात असून या पार्टीत हजर असलेल्या इतरांची चौकशी केली जात आहे.

विशेष बाब म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची नावं उघड झाली होती. त्यावेळी श्रद्धा कपूरसह, रकुल प्रीत सिंग, दीपिका पदुकोण, सारा अली खान या अभिनेत्रींचीही एनसीबीमार्फत चौकशी करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT