Kinshuk Vaidya Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kinshuk Vaidya Engagement: 'शाका लाका बूम बूम फेम' अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे 'संजू'ची होणारी बायको?

kinshuk Vaidya Get Engaged To his Girlfriend Diksha Nagpal: अभिनेता किंशुक वैद्यनं नुकताच साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर किंशुकने खास फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Manasvi Choudhary

टिव्हीवरील लोकप्रिय मालिका 'शाका लाका बूम बूम' ही लोकप्रिय मालिका आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण हि मालिका आवडीने पाहायचे. या मालिकेतील संजू या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. याच मालिकेतील संजू म्हणजेच अभिनेता किंशुक वैद्यनं नुकताच साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर किंशुकने खास फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. किंशुकच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर किंशुकने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. रोमॅटिंक अंदाजात दोघांनीही एकमेकांचे हात पकडले आहेत. निळ्या रंगाच्या मॅचिंग ड्रेसमध्ये दोघेही फारच सुंदर दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत या दोघांनीही एकमेकांना घातलेली साखरपुड्याची अंगठी दाखवली आहे. सोशल मीडियावर किंशुकच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स येत आहेत.

अभिनेता किंशुक वैद्यने कोरियोग्राफर दीक्षा नागपाल हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल बऱ्याच वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. आता या दोघांनीही साखरपुडा केला आहे. किंशुकने शेअर केलेल्या या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांकडून अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT