Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan News: शाहरुखच्या मन्नतमध्ये भिंत तोडून २ तरुण शिरले आत...; कारण विचारताच...

Shahrukh Khan's House Mannat: वांद्रे येथील शाहरुखच्या मन्नत या बंगल्यात दोन जण सुरक्षारक्षकांची नजर चुकवून घुसले होते.

Ruchika Jadhav

Bandra News: बॉलिवूड किंग खानच्या चाहत्यांसाठी मोठी चिंतेची बातमी समोर आली आहे. गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती शाहरुखच्या बंगल्यात घुसल्या होत्या. वांद्रे येथील शाहरुखच्या मन्नत या बंगल्यात दोन जण सुरक्षारक्षकांची नजर चुकवून घुसले होते. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. (Latest Shahrukh Khan News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर सुरक्षारक्षक तैनात होते. यावेळी त्यांची नजर चुकवत दोन तरुण भिंत तोडून आतमध्ये आले. त्यानंतर त्यांनी लपतछपत मन्नत बंगल्याचा तिसरा माळा गाठला. बाहेर असलेल्या एका सुरक्षारक्षकाची त्या दोघांवर नजर पडली. त्यावेळी ते तिसऱ्या माळ्यावरून आतमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होते.

सुरक्षारक्षकांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं आहे. हे दोन्ही तरुण मुळचे सुरत येथील असून एकाचे वय २१ तर दुसऱ्याचे २५ वय आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. तसेच परवानगी न घेता बंगल्यात प्रवेश केल्याप्रकरणी आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे शाहरुखच्या मन्नतमध्ये असा प्रकार घडला तर दुसरीकडे त्याची पत्नी गौरी खान विरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. किरीट जसवंत शहा या व्यक्तीने गौरी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तुलसियानी कन्स्ट्रक्शनमधून त्यांनी कोटींच्या किंमतीचा एक फ्लॅट खरेदी केला होता. गौरी या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यांनी खरेदी केलेल्या घराचे ८६ लाख रुपये भरले आहेत. मात्र अद्याप घर हातात मिळाले नाही. त्यामुळे कंपनीच्या सीएमडी अनिल तुलसियानी, संचालक महेश तुलसियानी यांच्यासह गौरी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT