Shah Rukh Khan Pathaan controversy Instagram @iamsrk
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: चाहत्यानं शाहरुखला विचारली अपूर्ण इच्छा, किंग खाननं दिलं 'हे' उत्तर...

अनेक हिट चित्रपट चाहत्यांना दिल्यानंतर शाहरुखने त्याची एक अपुरी इच्छा चाहत्यासमोर व्यक्त केली आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला 'पठान' चित्रपट आज अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाची चाहत्यांना बरीच उत्सुकता होती. शाहरुख तब्बल चार वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अनेक हिट चित्रपट चाहत्यांना दिल्यानंतर शाहरुखने त्याची एक अपुरी इच्छा चाहत्यासमोर व्यक्त केली आहे.

शाहरुख नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संवाद साधतो. चित्रपट प्रदर्शनाआधी ही आपल्या चाहत्यांसोबत त्याने संवाद साधला. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे सोशल मीडियावर एक सेशन ठेवलं होतं. या सेशनमध्ये शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखने त्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याचा ही प्रयत्न केला. याच सेशन दरम्यान त्याने त्याची अपूर्ण इच्छा चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

यावेळी शाहरुखच्या चाहत्याने त्याला एक प्रश्न विचारला की, “तुझी अशी कोणती इच्छा आहे जी अजून पूर्ण झालेली नाही?” त्या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख म्हणतो, “इतकी शक्ती माझ्यात कायम राहूदे की मी तुमच्या मुलांचंही मनोरंजन करू शकेन.” या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या ट्वीटवर कमेंट करत त्याचे चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

दरम्यान ‘पठान’मध्ये प्रमुख भूमिकेत शाहरुख खान सह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT