Shahrukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan Dunki Special: 'डंकी'चा परदेशातही डंका, शाहरुख खानच्या चित्रपटाचं यूकेच्या संसदेत होणार स्पेशल स्क्रीनिंग

Dunki Screening In UK Parliament: शाहरुख खानचा 'पठाण' आणि 'जवान'नंतर 2023च्या शेवटी डंकी सिनेमा रिलिज झाला. आता त्याचं स्पेशल स्क्रिनींग यूकेमध्ये होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shahrukh Khan Dunki In UK Parliament

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 2023 या वर्षाच्या शेवटी 'डंकी' हा चित्रपट आला होता. शाहरूखच्या या चित्रपटानेही अजिबात निराश केलं नाही. पठाण आणि जवानानंतर शाहरुखची डंकी स्टाइलही सर्वत्र पाहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी देखील त्यांच्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानं खूप खूश आहेत. (latest entertainment news)

आता 'डंकी' चा (Dunki movie) डंका परदेशात वाजताना दिसतोय. शाहरुख खानच्या या चित्रपटाचं यूकेच्या संसदेत स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॉमेडी-ड्रामा चित्रपट

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shahrukh Khan) 2023 मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डँकी' या चित्रपटांसह तीन मेगा हिट चित्रपट दिले आहेत. 'डंकी'चं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. हा चित्रपट 21 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट लोकांच्या मनाला भिडला होता. शाहरुख खानची जुनी स्टाईल या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटाने चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणलं, त्यांना भावूक केलं.

'डंकी' हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटातून शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम (Dunki movie)केलंय. राजकुमार हिरानी मुन्ना भाई, पीके, 3 इडियट्स आणि संजू यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जातात. बोमन इराणी, विकी कौशल आणि तापसी पन्नू यांच्याही या 'डंकी' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ब्रिटनमधील संसदेत डंकी

चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. मात्र चित्रपटाबाबतच्या चर्चा काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतानंतर आता ब्रिटनमधील संसदेत (Dunki In UK Parliament) डंकी दाखविण्याची चर्चा सुरू असल्याची बातमी समोर येतेय.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना शाहरुख खानसोबत काम करण्याची नेहमीच इच्छा होती. हे त्यांनी स्वतः सर्वांसमोर सांगितलं आहे. त्याचबरोबर शाहरुखने राजकुमार हिरानी यांच्या कामाचंही अनेकदा कौतुक केलं आहे. या अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या जोडीने चित्रपटाच्या खर्चापेक्षा जास्त कमाई करून चित्रपट सुपरहिट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT