Suhana Khan Buys Property in Alibaug Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhana Khan झाली अलिबागकर! खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, किंमत जाणून बसेल धक्का

Suhana Khan Buys Property in Alibaug: हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण अभिनेत्रींपैकी एक असलेली सुहाना खान सध्या चर्चेत आली आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या मुलीने तिचे पैसे प्रॉपर्टीमध्ये गुंतवले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Suhana Khan Buys Property in Alibaug:

हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण अभिनेत्रींपैकी एक असलेली सुहाना खान सध्या चर्चेत आली आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या मुलीने तिचे पैसे प्रॉपर्टीमध्ये गुंतवले आहेत. सुहानाने अलिबागमध्ये नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

सुहाना खानने खरेदी केलेली जमीन ही शेतजमीन असून ही अंदाजे 78,361 स्क्वेअर फूट आहे. सुहानाने ही प्रॉपर्टी किती किमतीत खरेदी केली. हे जाणून घेऊ....   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतक्या कोटींना खरेदी केली प्रॉपर्टी

IndexTap.com ने शेअर केलेल्या कागदपत्रांनुसार, सुहानाने अलीाबादच्या रायगड जिल्ह्यात सुमारे 9.50 कोटी रुपयांची 78,361 स्क्वेअर फूट जमीन खरेदी केली आहे. यात असं सांगण्यात आलं आहे की, अभिनेत्रीने 13 फेब्रुवारी रोजी 57 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहेत. (Latest Marathi News)

अलिबागमध्ये आहे आणखी एक प्रॉपर्टी

मिळालेल्या माहितीनुसार, सुहानाची प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, सुहानाने जून 2023 मध्ये अलिबागमध्ये 1.5 एकरमध्ये पसरलेली शेतजमीन 12.91 कोटी रुपयांना खरेदी केली होती.

दरम्यान, सुहाना खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने अलीकडेच अभिनय आणि गायनात क्षेत्रात पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी 7 डिसेंबरला तिचा 'द आर्चीज' हा पहिला चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जोया अख्तरने दिग्दर्शित केला होता आणि त्यात सुहानाने वेरोनिकाची भूमिका साकारली होती. सुहाना प्रोफेशनल गायिका नाही, मात्र पटकथेच्या मागणीमुळे तिने तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी एक गाणे रेकॉर्ड केले होते. आगामी काळात ती आणखी काही चित्रपटात आपल्याला दिसू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

SCROLL FOR NEXT