Shahid Kapoor On Physical Abuse Instagram
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor On Haider: ज्या सिनेमामुळे लोकप्रिय झाला त्याच सिनेमात शाहिदने फुकटात काम केले, स्वतःच केला खुलासा

Shahid Kapoor Movie: अनीस बज्मीच्या कॉमेडी चित्रपटात शाहिद कपूर, रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे.

Pooja Dange

Shahid Kapoor Didn't Charge Anything For Haider:

शाहिद कपूर अभिनित आणि विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'हैदर' चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील शाहिद कपूरचा अभिनय सर्वांच्या पसंतीस पडला होता. शाहिद कपूरने त्याची लव्हर बॉयच्या इमेजला छेद देत अभिनेत्याने एक वेगळा प्रयत्न या चित्रपटामध्ये केला होता. शाहिदने या चित्रपटासाठी एक रुपया देखील घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

फिल्म कम्पॅनियन दिलेल्या मुलाखतीत खुद्द शाहिद कपूरने याचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत शाहिदने सांगितले की, तो टीममधला एकटा व्यक्ती होता ज्याने चित्रपटातील भूमिकेसाठी मानधन घेतले नव्हते.

शाहिद कपूर म्हणाला, त्याचे मानधन चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त होते. तेव्हा निर्मात्यांनी त्याला सांगितले की, जर आम्ही तुला पैसे दिले तर आम्ही चित्रपट बनवू शकत नाही. निर्मात्यांना वाटलं की पैसे देणार नाहीत म्हटल्यावर शाहिद काम करणार नाही. परंतु चित्रपटाची स्क्रिप्ट इतकी चांगली होती की शाहिद नाही म्हणू शकला नाही.

या मुलाखतीत शाहिद कपूरला आणखी कोणत्या चित्रपटामध्ये फुकट काम केले आहे का? असे देखील विचारण्यात आले. यावर शाहिदने उत्तर दिले की, विशाल भारद्वाजच्या 'हैदर' चित्रपटाशिवाय त्याने असं कधीही केलेलं नाही. शाहिद म्हणाला की तो नेहमी असं करून शकत नाही. तो स्वतःला अशी सवय लावू शकत नाही करत त्याला स्वतःच कुटुंब देखील सांभाळायचं आहे. (Latest Entertainment News)

'हैदर' हे शेक्क्सपियरच्या 'हॅम्लेट' या पुस्तकाचे रूपांतर होते.या चित्रपटामध्ये केलेल्या शाहिद कपूरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झालं. इरफान खान, श्रद्धा कपूर, तब्बू यांनी या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. (Celebrity)

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 'फर्जी' मधून ओटीटी पदार्पण केले. आता तो पुढील प्रोजेक्टमध्ये क्रिती सेननसोबत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये धर्मेंद्रही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अनीस बज्मीच्या कॉमेडी चित्रपटात शाहिद कपूर, रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT