Shahid Kapoor On Saif Ali Khan: १६ जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला केला. त्या व्यक्तीने सैफच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने अनेक वेळा वार केले, त्यामुळे सैफ गंभीर जखमी झाला. सैफला ताबडतोब लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफच्या प्रकृतीची माहिती देताना, डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की तो आता ठीक आहे आणि त्याला एक आठवडा बेड रेस्टवर राहावे लागेल. दरम्यान, सैफवरील हल्ल्यावर बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. या घटनेवर शाहिदने दुःख व्यक्त केले आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान संशयिताचे नाव शाहिद असल्याचे उघड झाले. दुसरीकडे, शाहिद कपूरने त्याच्या 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंट दरम्यान, पापाराझींनी शाहिदला सैफवरील हल्ल्याबद्दल प्रश्न विचारला. शाहिदने उत्तर दिले आणि सैफच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
सैफवरील हल्ल्यावर शाहिद कपूरची प्रतिक्रिया
शाहिद कपूर म्हणाला, जे घडले ते खूप दुःखद आहे आणि आम्ही सर्वजण खूप चिंतेत आहोत. मला आशा आहे की सैफची तब्येत लवकरच सुधारेल आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजल्यावर मला दिलासा मिळाला आहे. मुंबईसारख्या शहरात, वैयक्तिक जागेत असे प्रकार होते खूप धक्कादायक आहे. पण मला वाटते की पोलिस नक्कीच या प्रकरणाचा छडा लावतील. मुंबई हे खूप सुरक्षित शहर आहे. इथे तुम्ही जर रात्री २ किंवा ३ वाजता घराबाहेर असाल तरी तुम्ही सुरक्षित असता.
सैफच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी स्टार्सनी केली प्रार्थना
अनेक बॉलिवूड स्टार्सनी सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. करीना कपूरने शेअर केलेल्या पोस्टवर प्रियांका चोप्राने कमेंट केली आहे. रणवीर सिंग, दिया मिर्झा, सोनाक्षी सिन्हा, सोनी राजदान यांच्यासह अनेक स्टार्सनी सैफ अली खानच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. सैफला आता आयसीयूमधून एका खास खोलीत हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी सैफला एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.