Farzi Web Series Review
Farzi Web Series Review Instagram @shahidkapoor
मनोरंजन बातम्या

Farzi Reviews: 'फर्जी'ची चालतेय मर्जी, शाहिद कपूर-विजय सेतुपतीची डेब्यू वेबसीरीजचा ट्विटरवर बोलबाला

Pooja Dange

Farzi Release On Amazon Prime: शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांची 'फर्जी' ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. दोघांनीही या वेबसीरीजच्या माध्यमातूम ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. राज आणि डीके या सुप्रसिद्ध जोडीने 'फर्जी'चे दिग्दर्शन केले आहे.

'फर्जी' या वेबसीरीजमध्ये शाहिद कपूर चोर तर सुपरस्टार विजय सेतुपती पोलिसाचे पात्र साकारणार आहेत. शाहिदला बनावट नोटा बनवण्यापासून रोखण्यासाठी विजय पोलिस म्हणून प्रयत्न करत असतो.

'फर्जी' ही वेबसीरीज अमेझॉन प्राईमवर १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होती. पण प्राईम गेल्या काही काळापासून जो ट्रेंड वापरत आहे त्यानुसार त्यांनी ही वेबसीरीज देखील वेळेआधी प्रदर्शित केली. १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणारी ही वेबसीरीज एक दिवस आधी म्हणजे ९ फेब्रुवारीला प्रदर्शित झाली.

आठ भागांची क्रिमिनल थ्रिलर वेबसीरीज सनी (शाहिद कपूर) या अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टच्या दृष्टीकोनातून चित्रित केली गेली आहे. सनी त्याच्या आजोबांच्या प्रसिद्ध प्रिंटिंग प्रेस कंपनीची पडझड रोखण्यात अपयशी ठरतो.

सनी, त्याचा जिवलग मित्र फिरोज त्यांचे प्रिटिंग प्रेसमधील ज्ञान आणि कौशल्य बनावट नोटा बनवायचे असे ठरवतात. जेणेकरून ते झटपट पैसे कमावून भारतातील श्रीमंत व्यक्ती बनू शकतात.

दुर्दैवाने, गुन्हेगार आणि पोलिसांसह अनेक वाईट लोकांना सनीच्या या पैसे कमविण्याच्या धंद्यात रस निर्माण होतो. काहीजण सनीला थांबवण्याचा किंवा काहीजण त्याच्या कष्टाने कमावलेले पैसे चोरण्याचा प्रयत्न करू लागतात.

शाहिद कपूर आणि विजय सेतुपती सोबत, "फर्जी" या वेबसीरीजमध्ये राशि खन्ना, रेजिना कॅसॅंड्रा, के के मेनन, झाकीर हुसेन, अमोल पालेकर, भुवन अरोरा आणि कुब्ब्रा सैत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

शाहिद "ब्लडी डॅडी" या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. विजय सेतुपती "मेरी ख्रिसमस" या चित्रपटामध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

Today's Marathi News Live : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT