Shah Rukh Khan Reveals Dunki Release Date Saam TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan On Dunki: 'मेरी फिल्म आती है तब...' 'जवान'च्या पार्टीत शाहरूख खानने सांगितली 'डंकी'ची रिलीज डेट

Dunki Released Date: 'पठान', 'जवान' चित्रपटानंतर प्रेक्षकांचे लक्ष शाहरूख खानच्या 'डंकी' चित्रपटाकडे आहे.

Pooja Dange

Shah Rukh Khan At Jawan Success Party:

शाहरुख खान सध्या त्याच्या 'जवान' चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटत आहे. नुकतीच 'जवान'च्या टीमने चित्रपटाची सक्सेस पार्टी साजरी केली. शाहरूख खानने ५ वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. तसेच दमदार चित्रपट घेऊन शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'पठान', 'जवान' चित्रपटानंतर प्रेक्षकांचे लक्ष शाहरूख खानच्या 'डंकी' चित्रपटाकडे आहे. 'डंकी' पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सक्सेस पार्टीमध्ये शाहरूखने 'डंकी'ची अपडेट शेअर केली आहे.

'जवान'च्या सक्सेस पार्टीमध्ये शाहरूख खान अनेक गोष्टींवर भाष्य केले. या इव्हेंटमध्ये शाहरुख त्याच्या कमबॅकविषयी देखील बोलला. शाहरुखने सांगितले की, खूप वर्षांनी कॅमेरा फेस करताना मी थोडा नर्वस होतो. तेव्हा आर्यन खानने मला मोठा सल्ला दिला.

शाहरूख म्हणाला की आर्यनने त्याला सांगितले की, 'मी आणि सुहानाने तुमचे स्टारडम खूप अनुभले आहे. आता तुम्हाला पुढच्या पाच चित्रपटांमध्ये खूप मेहनत करावी लागेल. म्हणजे अबराम देखील तुमच्या स्टारडमचा अनुभव घेऊ शकेल.' आर्यन खानच्या सल्ल्यानेच शाहरुख खानला पुढे काम करण्याची प्रेरणा मिळाली. (Latest Entertainment News)

'डंकी' रिलीज डेट

शाहरुख खान म्हणाला की, 'माशाल्लाह, देवाने 'पठान'वर खूप कृपा दाखवली, त्यापेक्षा जास्त कृपा त्याने 'जवान'वर केली. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मंगलदिनी 'पठान' प्रदर्शित झाला, तर जन्माष्टमीच्या शुभ दिवशी 'जवान' प्रदर्शित झाला.'

बोलता बोलता शाहरुख खानने 'डंकी'विषयी देखील मोठी अपडेट शेअर केली. शाहरुख म्हणाला की, 'नवीन वर्ष सुरू होणार आहे, तसेच ख्रिस्मस पण येईल. याचदरम्यान आम्ही 'डंकी' देखील तुम्हाच्या भेटीला घेऊन येणार आहोत. मी सर्व धर्मांना मानतो. जेव्हा माझा चित्रपट प्रदर्शित होती त्या दिवशी ईद असते. मी खूप मेहनत करत आहे.'

केल्या काही महिन्यांपासून अशी चर्चा आहे की, 'डंकी' २२ डिसेंबरला प्रदर्शित होईल. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शाहरुख खानसह तापसी पन्नू या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT