Shah Rukh Khan - Suhana Khan Sharing Screen Soon Saam TV
मनोरंजन बातम्या

SRK - Suhana Khan Movie: सुहानाच्या चित्रपटात शाहरुख साकरणार महत्वाची भूमिका, बाप- लेकीला एकाच फ्रेममध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक

Shah Rukh Khan Next Movie: सुहाना खान आणि शाहरुख खान यांना घेऊन सुजॉय घोष एक नवीन चित्रपट करत आहेत.

Pooja Dange

SRK - Suhana Khan to star in Sujoy Ghosh's Next Movie:

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच जोया अख्तरच्या चित्रपट 'द आर्चिज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान आता शाहरुख आणि सुहाना एकाच चित्रपटामध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे.

शाहरुख खान आणि सुहाना एकत्र काम करणार अशी आधीही चर्चा होती. पण आता यात दिग्दर्शकांचे या वृत्ताबाबत खुलासा केल्याने प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुहाना खान आणि शाहरुख खान यांना घेऊन सुजॉय घोष एक नवीन चित्रपट करत आहेत. या वृत्ताने सर्वजण खूप एक्ससाईटेड झाले आहेत.

इंडिया टुडेने त्यांच्या अहवालात लिहिले आहे, शाहरुख खान, सुहनच्या चित्रपटामध्ये फक्त कॅमिओ करणार नाहीय. त्याचा रोल मोठा आणि महत्त्वाचा असणार आहे जसा त्याने डियर झिंदगीमध्ये साकारला होता. 'शाहरुख खान सुजॉय घोष यांच्या आगामी चित्रपटामध्ये कॅमिओ करणार नाही. तर शाहरुख खान महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. शाहरुख या चित्रपटामध्ये सुहानाच्या मदतनिसाची भूमिका साकारणार आहे.

शाहरुख, सुहाना यांच्या या चित्रपटाची कथा काय असणार याविषयीची माहिती देखील इंडिया टुडेने दिली आहे. सुजॉय घोष यांचा चित्रपट एक स्पाय थ्रिलर चित्रपट असणार आहे. ज्यामध्ये सुहाना स्पायची (गुप्तहेर) मुख्य भूमिका साकारणार आहे. प्रत्येक स्पायच्या मदतीला एक असिस्टंट असतो आणि ही भूमिका शाहरुख खान असणार आहे. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू झाले आहे.

सुजॉय घोष आणि शाहरुख खान 'बदला' या चित्रपटासाठी एकत्र आले होते. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू उन्नी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

शाहरुखच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर सद्य जवानची चर्चा आहे. हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT